Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट, 'या' 11 जिल्ह्यांना धोक्याचा अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा दुहेरी वातावरणाचं सावट निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून नुसत्या घामाच्या धारा वाहत आहेत, आजही काही ठिकाणी हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जाणून घेऊयात 4 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 04 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात पुन्हा दुहेरी वातावरणाचं सावट

point

काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा दुहेरी वातावरणाचं सावट निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून नुसत्या घामाच्या धारा वाहत आहेत, आजही काही ठिकाणी हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच जाणून घेऊयात 4 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर घरात घुसून ब्लेडने सपासप वार; रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागली...

कोकण 

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली नसून अवकाळी पावसाचं सावट नाही. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये हवामान कोरडं राहणार आहे. याच विभागात अवकाळी पावसाचा कोणताही अलर्ट दिलेला नाही. उष्ण वातावरण कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला. 

मराठवाडा 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच या विभागात अवकाळी पावसाची चिंता नाही, तर उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा : बीड : अजोळी गेलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर नराधम आजोबाने केले अत्याचार, गुप्तांगाला...

विदर्भ 

विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. तर दुसरीकडे यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत हवामान विभागाने अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला.