पुणे : 3 वर्षीय चिमुरड्याची बलात्कार करुन निर्घृण हत्या, बॅगेत लपवला मृतदेह; अल्पवयीन आरोपीला अटक

दक्षिण म्हाळुंगे भागात एका अवघ्या 3 वर्षांच्या निष्पाप बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Pune Crime News

Pune Crime News

मुंबई तक

• 11:44 AM • 03 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : 3 वर्षीय चिमुरड्याची बलात्कार करुन निर्घृण हत्या

point

बॅगेत लपवला मृतदेह

point

अल्पवयीन आरोपीला अटक

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील नसरापूर घटनेनंतर म्हाळुंगे परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दक्षिण म्हाळुंगे भागात एका अवघ्या 3 वर्षांच्या निष्पाप बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

हे वाचलं का?

1 मे 2026 रोजी दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पीडित बालक घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी परिसरात बराच शोध घेतला, मात्र तो न सापडल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

बॅगेत सापडला मृतदेह

तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळातच हा बालक जवळच असलेल्या एका खोलीत बॅगेच्या आत मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, मुलावर अत्याचार केल्यानंतर त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 238 आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात दाखला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास अधिक वेगवान केला.

हे ही वाचा : पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर घरात घुसून ब्लेडने सपासप वार; रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागली...

आई मुलाला शोधत आली होती...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि निष्पाप बालक एकाच परिसरात शेजारी राहत होते. शुक्रवारी (1 मे) दुपारी अडीचच्या सुमारास अल्पवयीन आरोपीने मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरी बोलावले. घराच्या आत आरोपीने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. याच दरम्यान मुलाची आई त्याला शोधत आरोपीच्या घरी पोहोचली होती, मात्र आरोपीने खोटे बोलून तिला परत पाठवले. त्यानंतर आरोपीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत तीन वर्षांच्या चिमुरड्याची चाकूने वार करून हत्या केली. हत्येनंतर आरोपीने मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये लपवून ठेवला आणि तिथून पळ काढला.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी बिहारचा रहिवासी असून तो अल्पवयीन आहे. गुन्ह्यानंतर तो बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेरून पकडले.

हे ही वाचा : बायकोकडून छळ अन् IAS मेहुणीचा 'तो' हुकूम, न्यायाधीशाने केली आत्महत्या; वडिलांचा खळबळजनक खुलासा

आरोपीची कबुली

चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. तो अवघ्या 15 दिवसांपूर्वीच या ठिकाणी आला होता. त्यानंतर त्याला कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना समाजाला हादरवून सोडणारी असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. अशा घटना रोखण्यासाठी समाज आणि कुटुंब या दोघांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.