बायकोकडून छळ अन् IAS मेहुणीचा 'तो' हुकूम, न्यायाधीशाने केली आत्महत्या; वडिलांचा खळबळजनक खुलासा
वडिलांनी सांगितले की, घटनेच्या रात्री सुमारे 10 वाजता अमनचा फोन आला होता. फोनवर त्यांनी म्हटले की, ते खूप त्रासलेले असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. मुलाचे बोलणे ऐकताच वडिलांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि धीर दिला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोकडून छळ अन् IAS मेहुणीचा 'तो' हुकूम
न्यायाधीशाने केली आत्महत्या
वडिलांचे गंभीर आरोप
Delhi Judge Suicide : दिल्लीच्या सफदरजंग परिसरात न्यायाधीश अमन कुमार शर्मा यांनी बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या खळबळजनक घटनेनंतर मृताच्या वडिलांनी दिलेली माहिती समोर आल्याने हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. वडिलांच्या म्हणण्यानुसार, अमन दीर्घकाळापासून मानसिक तणावाखाली होते आणि त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे अत्यंत त्रस्त होते.
वडिलांनी सांगितले की, घटनेच्या रात्री सुमारे 10 वाजता अमनचा फोन आला होता. फोनवर त्यांनी म्हटले की, ते खूप त्रासलेले असून त्यांचे जगणे कठीण झाले आहे. मुलाचे बोलणे ऐकताच वडिलांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि धीर दिला. मात्र, मुलाची परिस्थिती पाहून ते तात्काळ अलवरहून दिल्लीला रवाना झाले आणि रात्री 12 च्या सुमारास घरी पोहोचले.
IAS मेहुणीचा हुकूम
घरी पोहोचल्यानंतर अमन यांनी वडिलांना सांगितले की, पत्नीसोबत गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरू होता आणि त्यांना छळवणूक झाल्यासारखे वाटत होते. वडिलांच्या म्हणण्यानुसार, अमनची पत्नी देखील एक न्यायालयीन अधिकारी असून घरात त्यांचा मोठा दबदबा होता. याशिवाय घरात सुनेची आयएएस (IAS) बहीण म्हणजेच अमनची मेहुणी निधी हिचाही हुकूम चालायचा. घरात प्रत्येक निर्णय निधीच्या मर्जीनेच होतो आणि मी स्वतःला हतबल समजत आहे, असेही अमनने म्हटले होते. निधी जम्मूमध्ये कार्यरत आहे.
वडिलांचा असा आरोप आहे की, जेव्हा त्यांनी सुनेशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने त्यांना घरातून निघून जाण्याची धमकी दिली आणि जर ते गेले नाहीत तर पोलिसांना बोलावू असे सांगितले. यानंतर वडिलांनी सुनेच्या आई-वडिलांशी आणि इतर नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप केला नाही. अगदी सुनेच्या काकांनीही मदत करण्यास नकार दिला.









