Maharashtra Weather : राज्यात पुन्हा वारं फिरलं, 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार थैमान, IMD चा अलर्ट जारी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली असताना, हवामान विभागाने विदर्भातील यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट जारी केला. तसेच उर्वरित भागात सामान्य वातावरण असेल अशी शक्यता आहे, तसेच बहुमतांश ठिकाणी हवामान कोरडे आणि उष्ण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 03 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात उष्णतेची तीव्रता

point

'या' चार जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट जारी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली असताना, हवामान विभागाने विदर्भातील यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट जारी केला. तसेच उर्वरित भागात सामान्य वातावरण असेल अशी शक्यता आहे, तसेच बहुमतांश ठिकाणी हवामान कोरडे आणि उष्ण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशातच 3 मे 2025 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज जाणून घेऊयात. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : 'मिसिंग लिंक'ला 'या' नेत्याचे नाव देण्याची मागणी

कोकण 

कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील अशी शक्यता वर्तवली. याच विभागात समुद्रकिनारपट्टी भागात आर्द्रतेने उकाडा अधिक जाणवेल, असा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात हवामान हे प्रामुख्याने कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे. दुपारी अधिक उन्हाचा चटका जाणवेल आणि उष्णतेचे वारे वाहणार आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा अधिक पारा वाढणार आहे. या विभागात एकूण हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा या विभागातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, जालना आणि हिंगोलीमध्ये उष्णतेची अधिक तीव्रता जाणवेल. बहुतांश परिसरात हवामान कोरडं राहणार आहे. 

हे ही वाचा : तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं, आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर; तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात

विदर्भ 

विदर्भ विभागात यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  तसेच अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत उष्णतेचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.