तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं, आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर; तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात

Solapur crime : सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात ट्रिपल मर्डरने तालुका हादरून गेला आहे. मध्यरा‍त्री अज्ञातांनी आई आणि मुलांवर तलवारीने हल्ला करून निर्दयीपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर, तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

Solapur Crime

Solapur Crime

मुंबई तक

02 May 2026 (अपडेटेड: 02 May 2026, 09:37 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं

point

आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर; तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात

Solapur Crime : सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडाने तालुका हादरून गेला आहे. मध्यरा‍त्री अज्ञातांनी आई आणि मुलांवर तलवारीने हल्ला करून निर्दयीपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील मृतांची ओळख गायत्री सुधाकर मस्के (वय 42),  प्रिया मस्के (वय 18) आणि इयत्ता दहावीत शिक्षण घेणारा शिवराय मस्के (वय 16) यांचा समावेश होत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला पाठवले तिचे शारीरिक संबंध करतानाचे व्हिडिओ, बायकोचे 'ते' Video पाहून नवऱ्याने...

तिहेरी हत्याकांडानं सोलापूर हादरलं 

अज्ञातांनी तिघांवरही क्रूरपणे हल्ला करत हत्या केली. संपत्तीवरून वादाचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनं गावातील लोकांनी शोक व्यक्त केला आहे, तसेच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर, तर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात 

संबंधित प्रकरणात आई आणि मुलीचा मृतदेह घराच्या गच्चीवर आढळून आला होता, तर दुसरीकडे मुलाचा मृतदेह हा बैठक खोलीत आढळून आल्याची माहिती समोर आली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या हत्याकांडाची माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनेचा तपास केला. 

हे ही वाचा : नवरा तरुणाला फ्लॅटवर बोलावून नको तेच .., बायकोचे गंभीर आरोप, असं बाहेर आणलं नवऱ्याचं कांड

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. या घटनेनं बोरामणी गावासह संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला. या घटनेनं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर येऊन ठाकला आहे. गेली काही वर्षांपासून राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंतेची बाब निर्माण झाली आहे.