Sangli News, स्वाती चिखलीकर : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये येरळा नदीमध्ये पोहायला गेलेली आठ मुले नदीमध्ये बुडाली. त्यातील सात जणांना वाचविण्यात यश आले असून एका वीस वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे . फिरदोस जाकीर शिकलगार असे या मुलीचे नाव असून तिचे मूळ गाव कोरेगाव आहे तर ती मुंबई येथे राहत होती.
ADVERTISEMENT
आनंदावर विरजण
भाळवणी येथे शिकलगार मळ्यामध्ये एका लग्न समारंभानिमित्त मुंबई तसेच इतर बाहेर गावातून मोठ्या प्रमाणावर पाहुणे आले होते. येथील शिवतेज मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रम सुरू असताना काहीजण येरळा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यामध्ये 17 ते 18 लहान मुले व मुली होती. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे पालक सुद्धा होते. ही सर्व मुले 12 ते 14 या वयोगटातील होती.
हे ही वाचा : पुण्यात शिकायला आलेल्या संगमेश्वरच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी युसूफ सय्यदला अटक
पाण्याचा अंदाज आला नाही
मुले पाण्यामध्ये खेळत असताना त्यांचे पालक नदीकाठावर पाहत उभा होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले पाण्याच्या खोल प्रवाहामध्ये गेली. त्याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी काही मुले धावली. या सर्व गोंधळामध्ये सात ते आठ मुले बुडाली. यावेळी नदीच्या काठावर असलेल्या पालकांनी व इतर सर्वांनी नदीमध्ये धाव घेऊन मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी बुडालेल्या सात मुलांना वाचवण्यात आले.
हे ही वाचा : घटस्फोटित मेकअप आर्टिस्टचं 5 वर्ष लैंगिक शोषण, बाल कल्याण समितीच्या सदस्याला अटक
उपचारादरम्यान मृत्यू
फिरदोस शिकलगार ही नदीच्या पाण्यामध्ये बुडाली. ज्या पालकांना पोहायला येत नव्हते तेदेखील मुलांना वाचवण्यासाठी नदीत उतरले होते. सर्व बुडालेल्या मुलांना पाण्याबाहेर काढल्यानंतर तीन ते चार मुले अस्वस्थ होती . त्यांना विट्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी फिरदोस जाकीर शिकलगार या वीस वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचे मूळगाव कोरेगाव होते. तर ती मुंबई येथे रहावयास होती.
ADVERTISEMENT











