घटस्फोटित मेकअप आर्टिस्टचं 5 वर्ष लैंगिक शोषण, बाल कल्याण समितीच्या सदस्याला अटक
एका 43 वर्षीय मेकअप आर्टिस्ट महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी हनियुर चंद्रगौडा (46) याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
घटस्फोटित मेकअप आर्टिस्टचं 5 वर्ष लैंगिक शोषण
बाल कल्याण समितीच्या सदस्याला अटक
Crime News : बेंगलोरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 43 वर्षीय मेकअप आर्टिस्ट महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी हनियुर चंद्रगौडा (46) याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी चंद्रगौडा हा रामनगर येथील बाल कल्याण समितीचा (CWC) सदस्य आहे. त्याने स्वतःची खोटी ओळख सांगून महिलेची फसवणूक केली आहे.
ओळख आणि फसवणुकीची सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला गेल्या आठ वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत आहे. 2021 मध्ये तिची ओळख चंद्रगौडाशी झाली. त्याने आपण टीव्ही सीरियल्सशी संबंधित असल्याचे सांगून, कामाचे आमिष दाखवून तिचा नंबर मिळवला. स्वतःला लेक्चरर असल्याचे भासवून आणि आपल्याला चांगला पगार आहे असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
हे ही वाचा : पुण्यात शिकायला आलेल्या संगमेश्वरच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी युसूफ सय्यदला अटक
ब्लॅकमेलिंग आणि पैशांची लूट
आरोपीने केवळ शारीरिक शोषणच केले नाही, तर पीडितेचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. 'जर माझं ऐकलं नाहीस, तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन,' अशी धमकी देत तो तिला सतत धमकावत राहिला. याच भीतीपोटी महिलेला त्याचे अत्याचार सहन करावे लागले. तपासात असेही समोर आले आहे की, 2021 पासून आतापर्यंत आरोपीने पीडितेकडून तब्बल 5 लाख रुपये उकळले आहेत, जे त्याने अद्याप परत केले नाहीत.
हे ही वाचा : ‘महायुतीच्या पंगतीत बसलात तर वाढलेले पदार्थ खावेच लागतील', शिंदेंचे शिलेदार झालेल्या बच्चू कडूंना कोणी सुनावलं?
खोट्या कागदपत्रांचा आधार
आरोपी चंद्रगौडाची फसवणूक इथेच थांबली नाही. 2024 मध्ये त्याने महिलेच्या कागदपत्रांचा वापर करून एक घर भाड्याने घेतले आणि तिथे स्वतःला तिचा पती म्हणून घोषित केले. इतकेच नाही तर, त्याने महिलेच्या मुलीच्या शाळेतील कागदपत्रांमध्ये स्वतःचे नाव वडील म्हणून लावून घेतले. तसेच, रस्त्यावरील टोल वाचवण्यासाठी त्याने 'एसपी' (SP) पदाचे बनावट ओळखपत्रही तयार केले होते.









