फुगा फुगवताना फुटला अन् श्वास नलिकेत अडकून बसला, 13 वर्षीय मुलीचा अंत

Viral News : फुगा फुगवताना एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आहे. फुगा फुगवताना मुलीच्या तोंडात रबरचा तुकडा शिरला आणि नंतर श्वासनलिकेत अडक्याची माहिती समोर आली आहे.

Viral News

Viral News

मुंबई तक

08 Dec 2025 (अपडेटेड: 08 Dec 2025, 05:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

13 वर्षांच्या कुमकुमचा फुगा फुगवताना मृत्यू

point

फुग्यातील रबराचा तुकडा श्वास नलिकेत

Viral News : फुगा फुगवताना एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आहे. फुगा फुगवताना मुलीच्या तोंडात रबरचा तुकडा शिरला आणि नंतर श्वासनलिकेत अडक्याची माहिती समोर आली आहे. अशातच तिचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलंदशहरच्या पहासू भागातील दिघी गावात घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबईत तरुणीला दिदी अशी हाक मारली, नंतर तिला भररस्त्यातच तरुणाने पॉर्न व्हिडिओ दाखवले, लाज आणणारा प्रकार

13 वर्षांच्या कुमकुमचा अंत 

मृत मुलगी ही इयत्ता आठवीत शिक्षण घेत असल्याचे वृत्त आहे. आठवीत शिक्षण घेणारी 13 वर्षांची कुमकुमने गावातील एका दुकानातून एक फुगा विकत घेतला होता. नंतर तिने तो फुगा धाकट्या भावाला फुगवून देण्यासाठी तिनं घर गाठलं. फुगा फुगवताना तो फुगा तिच्या तोंडातच फुटल्याचे सांगण्यात येत आहे. 

फुग्यातील रबराचा तुकडा श्वास नलिकेत

फुग्यातील रबराचा तुकडा हा तिच्या श्वास नलिकेत अडकून बसला होता. नंतर कुटुंबियांनी कुमकुमला तात्काळपणे उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. अशातच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्याचं वृत्त आहे. या घटनेनं सर्वांना मोठा धक्का बसला होता. 

हे ही वाचा : धावत्या रिक्षात महिलेवर सामुहिक बलात्कार, पोलिसांनी तीन नराधमांना उचललं; अमानवी कृत्याने देश हादरला

या प्रकरणाची माहिती पाहसू पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्व तपास केला. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, तिच्या श्वास नलिकेत फुग्याचा रबरचा तुकडा अडकून पडल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणात अद्यापही लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. 

    follow whatsapp