Viral News : प्रेमाला वयाचं, रंग-रुप कशाचंच बंधन नसते. एखाद्याचं प्रेम एवढं कसं आंधळं असू शकतं? असा अनेकदा प्रश्न उपस्थित होत असतो, पण हे खरं आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगरमधून समोर आली आहे. एका पाच मुलांच्या आईने भंगारवाल्यासोबत प्रेम करून त्याच्यासोबत विवाह केला. महत्त्वाची बाबत म्हणजे तिच्या थोरल्या मुलाच्या वयाऐवढाच तिचा होणारा पती असल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : दत्त जयंती निमित्त 'या' राशीतील लोकांवर राहणार कृपादृष्टी, फक्त 'हे' करा सर्व संकट अपसूक होतील दूर
भंगारवाल्या तरुणासोबत पाच मुलाच्या आईचा विवाह
या प्रकरणात महिलेनं पतीची आणि मुलांची अजिबात कसलीही पर्वा केली नाही. तिने आपल्याच पतीसमोर भंगारवाल्या तरुणासोबत दुसरा विवाह केला. ही प्रेमकथा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. हे प्रकरण जहांगीरगंजमधील हुसेनपूर खुर्द गावातील आहे. येथे राहणाऱ्या मुन्नी देवी नावाच्या पाच मुलांच्या आईने पतीला सोडून आपल्या प्रियकरासोबत लग्न केले होते. पहिल्या पतीने आपलं दु:ख व्यक्त करताना मी काय करू शकतो? असा प्रश्न केला आहे. ही प्रेमकथा वाऱ्यासारखी सर्वत्र पसरू लागली होती. या प्रकरणावर लोकही आश्चर्यचकीत झाले आहेत.
भंगार विकत असताना झालं प्रेम
भंगार विकत असताना हुसेनपूर खुर्द गावातील निखिल हा तरुण उदरनिर्वाहासाठी देवरिया जिल्ह्यातील भटानी पोलीस ठाणे परिसरात भंगार विकायचा. भंगार खरेदी करण्याच्या निमित्ताने त्याची भेट मुन्नी देवीसोबत झाली. मुन्नी ही विवाहित असून तिला पाच मुलं होती. तरीही, त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आपल्या प्रेयसीला पाच मुलं असल्याचा काहीही एक फरक पडणार नव्हता. दोघांनीही एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा : पुण्यात मौजमजा करायला पैसे पुरेनात, बी.टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांना सोबत घेऊन स्वत:च्या घरातच टाकला दरोडा
या प्रकरणाची माहिती जेव्हा घरात कळाली तेव्हा घरात मोठा वाद झाला. या प्रेमसंबंधाला समाजाने नाकारले. मात्र, मुन्नी ही आपल्या निर्णयावर ठाम होती. शेवटी पतीने तिला रोखले नाही. यानंतर आता मुन्नी आणि निखिल यांनी आलापूर पोलीस ठाणे परिसरात एक प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केला. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या लग्नात मुन्नीता पतीही उपस्थित होता.
ADVERTISEMENT











