पुण्यात मौजमजा करायला पैसे पुरेनात, बी.टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांना सोबत घेऊन स्वत:च्या घरातच टाकला दरोडा

मुंबई तक

Dhule Crime : पोलिसांनी संशयावरून भावेशची कसून चौकशी केली असता त्याने अपराधाची कबुली दिली. त्याच्या दोन्ही साथीदारांना देखील अटक करण्यात आली असून, तिघांकडून सर्व चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Dhule Crime
Dhule Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात मौजमजा करायला पैसे पुरेनात,

point

बी.टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांना सोबत घेऊन स्वत:च्या घरातच टाकला दरोडा

Dhule Crime : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चैन करण्यासाठी एका बी.टेक. विद्यार्थ्याने मित्रांच्या साथीने स्वतःच्याच घरात दरोडा टाकल्याचे उघड झाले आहे. साक्री पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत विद्यार्थ्याला आणि त्याच्या दोघा मित्रांना अटक केली आहे. भावेश नेरकर (वय 20) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पेरेजपूर रोडवरील सुयोग कॉलनीत राहणाऱ्या नेरकर कुटुंबाने 30 नोव्हेंबरच्या संध्याकाळी घरफोडीची तक्रार नोंदवली होती. फिर्यादीनुसार, संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान भावेश आणि त्याची आई नातेवाइकांकडे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून 10 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस नेल्याचा दावा करण्यात आला होता. सुरुवातीला ही घरफोडीची घटना सामान्य चोरीप्रमाणेच वाटत होती. मात्र तपास अधिकाऱ्यांनी तक्रारीतील विसंगती लक्षात घेऊन चौकशीचा फास आवळला.

हेही वाचा : तोतया IAS महिलेने मराठवाड्यातील खासदाराला लावला चुना, फसवणूक झाल्याचं समजताच म्हणाले...

तपासात उघड झाले की, पुण्यात बी.टेक. करत असताना भावेश झगमगाटी जीवनशैलीत रमला होता. त्या वातावरणाची सवय लागल्यानंतर खर्च भागवणे कठीण झाल्याने त्याने सोपा पैसा मिळवण्यासाठी स्वतःच्या घरातच चोरीचा बनाव करण्याचा निर्णय घेतला. पुण्यात असतानाच त्याने दोन मित्रांना मिळवून संपूर्ण योजना आखली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp