आधी कौमार्य चाचणी, चारित्र्यावर संशय अन् पतीचे अनैतिक संबंध! लग्नानंतर 6 महिन्यांतच नाशिकमध्ये नवविवाहितेची आत्महत्या

नाशिकमध्ये सासरच्या व्यक्तींच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहितेनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कौमार्य चाचणी घेण्यात आल्याचं सुद्धा पीडितेने चिट्ठीत लिहिलं होतं.

नाशिकमध्ये नवविवाहितेचं टोकाचं पाऊल

नाशिकमध्ये नवविवाहितेचं टोकाचं पाऊल

मुंबई तक

• 04:49 PM • 27 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आधी कौमार्य चाचणी, चारित्र्यावर संशय अन् पतीचे अनैतिक संबंध!

point

लग्नानंतर 6 महिन्यांतच नाशिकमध्ये नवविवाहितेची आत्महत्या

नाशिक: पंचवटीतील हिरावाडीमध्ये सासरच्या व्यक्तींच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहितेनं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नेहा संतोष पवार असं मृत महिलेचं नाव असून तिने आत्महत्या करण्यापूर्वी सात पानांची सुसाइड नोट लिहिली होती. या सुसाइड नोटमध्ये पती, सासू आणि नणंदा यांनी केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, कौमार्य चाचणी घेण्यात आल्याचं सुद्धा नेहाने चिट्ठीत लिहिलं होतं. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा  अधिक तपास करत आहे.

हे वाचलं का?

कौमार्य चाचणी करण्यात आली... 

दि. 26 नोव्हेंबर रोजी नेहा संतोष पवार या विवाहितेने दुपारी 1 वाजताच्या सुमारास टेलफोस नावाच्या विषारी औषधाचं सेवन केलं. त्यानंतर, तिला उलट्या होऊ लागल्याने तिला सद्गुरू हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होतं. मात्र उपचारादरम्यान नेहाचं निधन झालं. नेहाच्या लग्नाला केवळ 6 महिनेच झाली होती. मात्र, या कालावधीत तिचा सासरच्या लोकांकडून मानसिक छळ आणि जाच करण्यात आल्याचे आरोप पीडितेने सुसाईड नोटमध्ये केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नेहाला तिच्या सासरच्यांनी कौमार्य चाचणी देखील करण्यासाठी भाग पाडलं होतं. या संपूर्ण प्रकारात तिचा नवरा देखील सामील असल्याचे नेहाने म्हटलं आहे. आहे.

मासिक पाळीबाबत शंका 

इतकेच नव्हे तर माहेरी आल्यानंतर काही जादूटोणा तर घेऊन आली नाही ना? हे तपासण्यासाठी सर्वांच्या उपस्थितीत मयत नेहाची पर्स देखील तपासण्यात आली असल्याचं देखील सुसाइड नोटमध्ये नमूद आहे. मासिक पाळीचा त्रास झाल्यानंतर खातरजमा करण्यासाठी नेहाच्या सासूने सांगितल्याप्रमाणे तिच्या नणंदेने पॅड लाऊन तपासणी करण्यात आली. लग्नानंतर नवऱ्याने देखील कौमार्य भंगाचे रक्त का आले नाही? म्हणून संशय घेतला होता. या सर्व त्रासामुळे रोज रोज थोड मरण्यापेक्षा विष खाऊन झोपते आहे, असे सांगून नेहाने आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं.

हे ही वाचा: नाशिक : नवऱ्याने प्रेयसीसोबतचे अश्लील फोटो दाखवले, मासिक पाळी येत नसल्याने टोमणे; लग्नाच्या 6 महिन्यानंतर नवविवाहितेची आत्महत्या

पोलिसांचा तपास 

मृत महिलेचा भाऊ राहुल डावरे याने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये नेहाच्या सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणासंबंधी पोलिसांनी  हुंडाबळी, मानसिक छळ, मृत्यूस कारण ठरणे, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमांतर्गत सासरच्या 5 आरोपी व्यक्तींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी दिली. 

हे ही वाचा: शेतात भयंकर अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह... ही निर्दयी हत्या नेमकी कोणी केली?

आत्महत्येचं कारण लिहिताना पीडित महिलेची कौमार्याची चाचणी घेण्यात आली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कौमार्य चाचणी घेणं हा गुन्हा ठरवण्यात आला असून अशा गुन्ह्यांकडे महिला आयोगाने लक्ष द्यावं आणि पोलिसांनी या प्रकारात सबळ पुरावे गोळा करून सदर महिलेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्ण चांदगुडे यांनी केली आहे.

    follow whatsapp