Wagh Nakh : छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ वाघनखे महाराष्ट्रात येणार, पण…

रोहिणी ठोंबरे

• 10:10 AM • 02 Oct 2023

महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आणि लंडनचे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम यांच्यात एक सामंजस्य करार होणार आहे. याद्वारे शिवाजी महाराजांची ‘वाघ नखं’ हे शस्त्र भारतात परत आणले जाणार आहे.

Mumbaitak
follow google news

Chhatrapati Shivaji maharaj Wagh Nakha : महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आणि लंडनचे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम यांच्यात एक सामंजस्य करार होणार आहे. याद्वारे शिवाजी महाराजांची ‘वाघ नखं’ हे शस्त्र भारतात परत आणले जाणार आहे. (Wagh Nakha Which used by Chhatrapati Shivaji maharaj to kill Afzal Khan will get to Maharashtra government for 3 years on loan)

हे वाचलं का?

वाघ नख हे धार असलेलं टोकदार शस्त्र असून ते युद्धावेळी बोटांमध्ये अडकवून वापरले जात असे. हातात धरले तर वाघाच्या पंजासारखे ते दिसते. महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार 1 ऑक्टोबर रोजी लंडनला रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

Sanjay Raut : “…तेव्हा शिंदे ठाण्यात नगरसेवक होते”, राऊतांनी काढला इतिहास

‘वाघ नख’ कसं परत मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर मुनगंटीवार 3 ऑक्टोबरला व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला ​​भेट देणार आहेत. ते येथे संग्रहालयाचे संचालक ट्रिस्टन हंट यांची भेट घेतील आणि सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतील. या माध्यमातून लंडनचे हे संग्रहालय महाराष्ट्र सरकारला ३ वर्षांसाठी वाघ नख कर्जावर देणार आहे. ते राज्यातील विविध संग्रहालयांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे.

17 व्या शतकात मराठा साम्राज्याचे रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघाच्या नखांचा वापर केला. त्यांनी विजापूर आदिल शाही साम्राज्याचा प्रमुख असलेल्या अफजलखानचा या वाघ नखांनी वध केला. ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी जेम्स ग्रँट डफ याच्या ताब्यात वाघ नख होतं असं मानलं जातं. 1818 मध्ये त्याची सातारा राज्याचे राजकीय प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच्या वंशजांनी ते व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाला भेट म्हणून दिले.

Deoria : पती-पत्नी, दोन मुली आणि मुलाचा चिरला गळा, झाडल्या गोळ्या; कारण…

वाघाच्या नखांबाबत कोणते दावे केले जात आहेत?

व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमनुसार वाघ नखांची एक केसही (पेटी) आहे. स्कॉटलंडला परतल्यानंतर ग्रँट डफने ते बांधले होते. त्या केसवर (पेटी) लिहिले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ नख. त्यांनी एका मुघल सेनापतीचा वध केला. हे अवशेष जेम्स ग्रँट डफ ऑफ एडनला साताऱ्यात असताना मराठा पेशव्यांच्या प्रधानमंत्र्यांमार्फत देण्यात आले होते.”

Buldhana Accident: भरधाव ट्रक शेडमध्ये शिरला, झोपलेल्या 12 मजुरांना चिरडले

पण, याबाबत कोणताही ठोस पुरावा नाही. 1818 मध्ये मराठा पेशवा बाजीराव द्वितीय यांनी इंग्रजांसमोर शस्त्रे टाकली होती, असेही म्हटले जाते. तिसरी इंग्रज-मराठा लढाई हरल्यामुळे त्यांना कानपूरजवळील बिठूर येथे पाठवण्यात आले. कदाचित त्यांनी वाघ नखं ग्रँट डफकडे सुपूर्द केली असावीत. छत्रपती शिवरायांनीच वापरलेली ही वाघ नखं आहेत याचा कोणताही ठोस पुरावा नाही.

    follow whatsapp