प्रेमासाठी कायपण! बॉयफ्रेंडच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गर्लफ्रेंडने केलं भयंकर कृत्य, पोलिसही हादरले..

Shocking Love Story Viral News : उत्तर प्रदेशच्या बहराईजमध्ये एका प्रेयसीने तिच्या प्रियकराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही केलं, ते पाहून अनेकांना धक्काच बसला असेल.

Shocking Love Story Viral

Shocking Love Story Viral

मुंबई तक

28 May 2025 (अपडेटेड: 28 May 2025, 05:05 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकरासाठी तरुणीनं केलं भयानक कृत्य!

point

पोलिसांना समजताच दोघांच्याही मुसक्या आवळल्या

point

खतरनाक लव्ह स्टोरी होतेय व्हायरल

Shocking Love Story Viral News : उत्तर प्रदेशच्या बहराईजमध्ये एका प्रेयसीने तिच्या प्रियकराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही केलं, ते पाहून अनेकांना धक्काच बसला असेल. तरुणी तिच्या प्रियकरासाठी चोर बनली. प्रेमप्रकरणामुळे तरुणीने गुन्हा करण्यास सुरुवात केली. आता हे प्रकरण पडद्यावर आल्यानंतर धक्कादायक प्रेमकहाणी समोर आली आहे. 

हे वाचलं का?

प्रियकरासाठी तरुणीनं केलं धक्कादायक कृत्य!

प्रेमाचं वेड लागल्याने अनेक तरुण धोकादायक मार्ग अवलंबवत असल्याचं अनेकदा समोर आलंय. पण यावेळी उत्तर प्रदेशच्या बहराईजमध्ये खळबळजनक घटना घडली. कारण एका तरुणी प्रियकराचे शॉक पूर्ण करण्यासाठी चोरीसारख भयंकर गुन्हा केला.
हे भयंकर प्रकरण उत्तर प्रदेशच्या बहराईजमध्ये घडलं. कोतवाली काजीपूरमध्ये या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. येथील एका तरुणीचं अरुण नावाच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होतं. ही तरुणी एका घरी साफसफाई आणि कपडे धुवण्याचं काम करत होती. पण तिने मालकाच्या घरीच डल्ला मारला.

हे ही वाचा >> Pune Crime: पुणे हादरलं, जळालेले तीन मृतदेह, एक महिला आणि दोन मुलं..

प्रियकराला बाईक घेऊन दिली

प्रियकर अरुणला बाईक पाहिजे होती. याबाबत त्याच्या प्रेयसीला कळलं. अशातच तरुणीने तिच्या मालकाच्याच घरची तिजोरी लुटली. घरात ठेवलेले पैसे आणि सोनं चोरलं. सव्वा लाख रुपये खर्च करून तिने प्रियकर अरुणसाठी एक बाईक खरेदी केली. त्यानंतर सर्व पैसे आणि सोनं प्रियकराच्या घरी ठेवलं.

कसून चौकशी केल्यानंतर तरुणीचा झाला पर्दाफाश

ही तरुणी ज्या घरात काम करत होती, त्याच घरी तिने चोरी केली. घरमालकाला चोरीच्या घटनेबाबत कळताच त्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांना घरात काम करण्याऱ्या या तरुणीवर संशय आला. पोलिसांनी तिला रिमांडवर घेतल्यावर तिने चोरीचा गुन्हा कबूल केला. तसच या दोघांची लव्ह स्टोरीही पडद्यावर आली. याप्रकरणी कोतवाली नगरचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप सिंह यांनी म्हटलं की, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> तीन मुलांच्या आईचं शेजाऱ्याशी जडलं प्रेम! नवऱ्याला समजताच घडला मोठा कांड, गावातील लोकांसमोरच..

    follow whatsapp