RBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! तासाला कमवा 1000 रुपये..पण अर्ज कसा कराल? जाणून घ्या

आरबीआयने मेडिकस कन्सल्टंट पदासाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती कॉन्ट्रॅक्ट बॅसिसवर केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार rbi.org.in या आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरू शकतात.

RBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! तासाला कमवा 1000 रुपये..

RBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी! तासाला कमवा 1000 रुपये..

मुंबई तक

• 03:51 PM • 28 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

RBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

point

पेशाने डॉक्टर असलेल्यांसाठी RBI मध्ये नोकरीची संधी

point

RBI ने काढली मेडिकल कन्सल्टंट पदासाठी मोठी भरती

RBI Job Vacancy: जर तुम्ही पेशाने डॉक्टर असाल आणि तुमचं भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजेच रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये नोकरी करण्याचं स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. आरबीआयने मेडिकस कन्सल्टंट पदासाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती कॉन्ट्रॅक्ट बॅसिसवर केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार rbi.org.in या आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरू शकतात. 

हे वाचलं का?

काय आहे पात्रता?

या भरतीअंतर्गत एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस (MBBS) किंवा एमडी (MD) ची पदवी असलेले उमेदवारच या भरतीसाठी पात्र आहेत. यासोबतच जर तुम्ही जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असेल आणि किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव असेल, तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी आरबीआयने अद्याप कोणतीही वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.

किती मिळेल पगार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रति तास 1000 रुपये पर्यंत मानधन दिले जाईल. याचाच अर्थ तुम्ही दिवसातून फक्त काही तास काम करून चांगले उत्पन्न मिळवू शकता. विशेष म्हणजे कंत्राटी नोकरी असूनही ती खूपच सन्माननीय आणि फायदेशीर असल्याचं मानलं जातं.

हे ही वाचा: गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला...संभाजीनगर एन्काऊंटर प्रकरणात काय घडलं?

कशी होईल निवड? 

डॉक्यूमेन्ट व्हेरिफिकेशन आणि मुलाखतीच्या माध्यमातून या पदासाठी निवड केली जाईल. या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नसेल. जर तुमची कागदपत्रे योग्य असतील आणि तुम्ही मुलाखतीत चांगलं प्रेझेन्टेशन केलं तर तुमची निवड सहजरित्या होईल. 

हे ही वाचा: विषय हार्डच... पहिला Job सोडला अन् मिळाली 39 लाखांची Hike.. पठ्ठ्याने केलं तरी काय?

कसा कराल अर्ज?

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे. यामध्ये तुम्हाला ऑफलाइन फॉर्म भरावा लागेल. सर्वप्रथम तुम्ही आरबीआयच्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जा. फॉर्म भरल्यानंतर, पदवीची प्रत, फोटो, सही इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा आणि खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

रीजनल डायरेक्टर, 
ह्यूमन रिसोर्सेज मैनेजमेंट डिपार्टमेंट (रिक्रूटमेंट सेक्शन),
रिजर्व्ह बैंक ऑफ इंडिया,
मुंबई रीजनल ऑफिस,
शहीद भगत सिंह रोड, फोर्ट,
मुंबई - 400001

    follow whatsapp