Married Woman Viral News : प्रेमाला वय नसतं असं म्हटलं जातं. प्रेम कधी कुणावर होईल, हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथे घडला आहे. येथील एका पतीने पत्नीचा खून होण्याच्या भीतीने धक्कादायक निर्णय घेतला. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं पतीला कळलं. त्यानंतर या व्यक्तीने त्याच्या पत्नीची भेट चक्क तिच्या प्रियकरासोबत करून दिली. दोघांचं ऐकमेकांवर प्रेम असल्याने या व्यक्तीने त्याच्या पत्नीचे संबंध तिच्या प्रियकरासोबत जोडले. हे अनोख लग्न या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
ADVERTISEMENT
त्या गावात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना निघासन परिसरातील चखरा गावातील आहे. इथे राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेनं शेजाऱ्याशी विवाहबाह्य संबंध केले. ही महिला तीन मुलांची आई असून तिचा प्रियकर सतनामही दोन मुलांचा बाप आहे. या प्रेमसंबंधाबाबत महिलेच्या पतीला जेव्हा कळलं, तेव्हा त्याने आश्चर्यकारक निर्णय घेतला.
हे ही वाचा >> 45 वर्षांचा दिनेश 65 वर्षांच्या प्रेयसीकडे शारीरिक संबंधांसाठी गेला, पण महिलेचा जीवच गेला.. नेमकं काय घडलं?
महिलेचा पती गुरुनामने म्हटलं की, तो मागील दोन-तीन वर्षांपासून खूप नैराश्यात होता. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आमच्यात अनेकदा वादविवाद झाले. मारहाणही झाली आणि गुरुनामला जेलमध्येही जावं लागलं. पत्नीनेही मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. माझी पत्नी प्रियकरासोबत मिळून माझी हत्या करेल आणि संपत्तीवर कब्जा करेल, याची मला भीती होती.
त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरु होतं, याविषयी मला एक वर्षापासूनच माहित होतं. नातेवाईकांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तसच हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचलं. पण त्यातून काही काही मार्ग निघाला नाही. अखेर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी गुरुनामने निर्णय घेतला आण त्याने त्याच्या पत्नीचे प्रियकरासोबत प्रेमसंबंध जोडून दिले.
हे ही वाचा >> दिवाळं नाही ग्राहकांची होणार 'दिवाळी', आज सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण! 24 कॅरेटचे भाव तर वाचा..
अनोखं लग्न आणि मुलांची जबाबदारी..
गुरुनामने गावातील ज्येष्ठ मंडळींना बोलावलं. त्यानंतर गावातीन ग्रामस्थांच्या साक्षीने त्याने त्याच्या पत्नीचं आणि तिच्या प्रियकराचे प्रेमसंबंध जोडले. इतकच नाही तर महिलेचा प्रियकर राजविंदरने तिच्या तीन्ही मुलांचं पालनपोषण करण्याची जबाबदारीही घेतली आहे.
ADVERTISEMENT











