मांडव सजला, नवरी नटली.. पण शेवटपर्यंत एकटीच राहिली... धक्कादायक घटना

उत्तर प्रदेशात एका संतापजनक कारणावरून लग्न मोडल्याचं वृत्त समोर आलं आहे. लग्न मोडण्यामागचं कारण म्हणजे हुंड्यामध्ये कारची मागणी. नेमकं काय घडलं? पाहा.

लग्नाच्या दिवशी नवरी मंडपात तयार... मात्र नवरदेवाची वरात पोहेचलीच नाही

लग्नाच्या दिवशी नवरी मंडपात तयार... मात्र नवरदेवाची वरात पोहेचलीच नाही

मुंबई तक

28 May 2025 (अपडेटेड: 28 May 2025, 11:49 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नवरी लग्नाच्या मंडपात पाहत होती नवरदेवाची वाट

point

लग्नाच्या दिवशी नवरा लग्नाच्या मंडपात पोहचलाच नाही

point

उत्तर प्रदेशातील हुंड्याचं प्रकरण आलं समोर

UP News: उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. तिथल्या कोतवाली देहात परिसरातील महेश्वरी जट गावात एका संतापजनक कारणावरून लग्न मोडल्याचं वृत्त समोर आलं आहे. लग्न मोडण्यामागचं कारण म्हणजे हुंड्यामध्ये कारची मागणी. लग्नात हुंड्यामध्ये कार न मिळाल्याने नवरा वरात घेऊन लग्नात पोहोचलाच नाही. 

हे वाचलं का?

मंडपात नवरी वाटच पाहत राहिली...

आपल्या लग्नाच्या दिवशी नवरी हसना परवीन हातांना मेहंदी लावून मंडपात नवरदेवाची वाट पाहत होती. नवरी अगदी तयार होऊन नवरदेवाची वाट पाहत होती. घरात आणि आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी देखील चांगलीच व्यवस्था केली होती. मात्र, लग्नाची सर्व तयारी झाली असताना नवरदेवाची वरात मंडपात पोहोचलीच नाही. त्यावेळी लग्नाचं वातावरण अचानक दु:खद वातावरणात बदललं. त्याक्षणी नवरी आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. 

हे ही वाचा: "पोलिसांनी सुपारी घेऊन एन्काऊंटर केला, कोऱ्या कागदावर... ", अमोल खोतकरच्या बहिणीचे गंभीर आरोप

कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

हसनाचं लग्न बिजनौरच्या दारा नगर गंजमध्ये राहणाऱ्या आसिफसोबत ठरलं होतं. हसनाचे वडील शकील अहमद यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लग्नाच्या आधी नवरदेवाच्या पक्षाला 3.5 लाख रुपये रोख दिले होते. मात्र लग्नाच्या एक दिवसाआधीच त्यांनी हुंड्यामध्ये कारची मागणी केली. त्यावेळी नवरीच्या कुटुंबियांनी आपण गरीब आहोत आणि कार नाही देऊ शकत, असं सांगितलं. यामुळे नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी लग्नामध्ये वरात घेऊन येणार नाही, असं सांगितली. 

हे ही वाचा: वाघांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच! चंद्रपुरात एकाच दिवसात दोघांना संपवलं, या महिन्यात 11 दगावले

लग्नामध्ये येणाऱ्या 350 च्या पाहुण्यांच्या जेवणाची आणि इतर पाहुणचाराची चोख व्यवस्था करण्यात आली होती. या लग्नाच्या तयारीत नवरीच्या कुटुंबियांना तब्बल 6 लाखांचा खर्च झाला. यासोबतच, हे लग्न मोडल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्यांना अपमान सहन करावा लागला. 

पोलिसांनी सुरू केला तपास

यामधील पीडित कुटुंबियांनी मुलाकडच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी मुलाच्या पक्षावर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी या घटनेसंदर्भात तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे लग्नाच्या घरात शोककळा पसरली आहे. 

    follow whatsapp