वर्धा : नवऱ्यानेच बायकोचे अश्लील व्हिडिओ नातेवाईकांना पाठवले, एवढ्यावरच न थांबत..

मुंबई तक

• 01:04 PM • 08 Jun 2026

Wardha crime : वर्ध्यातील हिंगणघाटात एक लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. ज्यात पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी विवाहित महिलेचा केवळ शारीरिक आणि मानसिक छळ केला, नाहीतर क्रूरतेची परिसीमा ओलांडली आहे. नवऱ्याने पत्नीचे खाजगी आणि आक्षेपार्ह फोटो तिच्या नातेवाईकांसह मित्रांजवळ प्रसारित केले.

राजकीय पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अश्लील व्हिडीओ व्हायरल!

राजकीय पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अश्लील व्हिडीओ व्हायरल!

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पीडित तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ अन् पैशांसाठी दबाव 

point

लाथा आणि ठोसे मारून निर्दयपणे मारहाण

point

पत्नीचे फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर केले शेअर 

Wardha Crime : वर्ध्यातील हिंगणघाटात एक लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. ज्यात पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी विवाहित महिलेचा केवळ शारीरिक आणि मानसिक छळ केला, नाहीतर क्रूरतेची परिसीमा ओलांडली आहे. नवऱ्याने पत्नीचे खाजगी आणि आक्षेपार्ह फोटो तिच्या नातेवाईकांसह मित्रांजवळ प्रसारित केले. महिलेच्या आत्मसन्मालनाला आणि सामाजिक प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी आरोपींवर पोलिसांनी कारवाई करत पाच जणांविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जरांगे समर्थक महिला थेट हाकेंना भिडली, रस्त्यावरील राड्याचा व्हिडीओ

पीडित तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ अन् पैशांसाठी दबाव 

घडलेल्या घटनेनुसार, 28 वर्षीय पीडित तरुणीने धाडस दाखवून वर्धा पोलिसांत तक्रार दाखल केली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. तिच्या सासरच्यांनी तिच्याकडे अधिक पैशांसाठी दबाव आणण्यास सुरूवात केली. जेव्हा तिने हे करण्यास नकार दिला तेव्हा, तिची शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला.  

लाथा आणि ठोसे मारून निर्दयपणे मारहाण

पीडितेनं सहन केलेला त्रास आपल्या आई वडिलांना सांगितला असता, त्यांनी सासरच्या मंडळींना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा कोणाताही परिणाम झाला नाही, त्यांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढू लागले होते. यानंतर सासरच्या मंडळींनी पीडितेला लाथा आणि ठोसे मारून निर्दयपणे मारहाण केली, तेव्हा क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. नंतर डिसेंबर 2025 रोजी, आरोपी नवऱ्याने पीडितेला जबरदस्ती करत मामाच्या घरी नेले आणि तिथेच सोडून दिले. या घटनेला बराच वेळ लोटून गेल्यानंतर आरोपी नवऱ्याने पत्नीची विचारपूस करण्यासाठी साधी माहेरी भेट देखील दिली नाही, तसेच तिला सन्मानाने घरी आणण्यासाठी कोणाताही पुढाकार घेतला नाही. 

पत्नीचे काही खाजगी फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर केले शेअर 

आरोपी नवऱ्याने एवढ्यावरच छळ न थांबवता, पत्नीला माहेरी सोडून दिल्यानंतर, सूड घेण्यासाठी आणि तिला समाजात पूर्णपणे बदनाम करण्यासाठी त्याने घृणास्पद कृत्य केले. त्याने आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेले पत्नीचे काही खाजगी फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर नातेवाईक आणि निवडक मित्रांना पाठवले. आपल्याच पतीच्या या घृणास्पद आणि अवमानास्पद कृत्याबाबतची माहिती कळाल्यानंतर, पीडित महिला पूर्णपणे खचून गेली.  

हे ही वाचा : Astrology : आजच्या दिवशी उत्साह, 'या' राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहील

पीडितेचा सर्व संयम सुटल्यानंतर तिने 6 जून रोजी पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. महिलेची तक्रार गांभीर्याने घेऊन, हिंगणघाट पोलिसांनी तात्काळपणे कायद्याची अंमलबजावणी करत आरोपी नवरा आणि इतर पाच नातेवाईकांविरूद्ध हुंड, मारहाण आणि सायबर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.