Delhi Bomb Blast Dead people Update: सोमवारी (10 नोव्हेंबर) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. घटनेतील मृतांपैकी एकूण 5 जणांची ओळख पटली असून 5 व्या मृताची ओळख 22 वर्षीय पंकज साहनी असल्याची सांगितलं जात आहे. पंकज हा बिहारच्या समस्तीपूर येथील रहिवासी असून तो ओला/उबर चालक म्हणून कार्यरत होता. संबंधित तरुण हा आपल्या एका नातेवाईकाला जुन्या दिल्ली स्टेशनजवळ सोडण्यासाठी जात होता. दरम्यान, त्या ठिकाणी ब्लास्ट झाला आणि Bomb स्फोटात पंकजचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
आजोबांशी शेवटचं बोलणं...
पंकजशी त्याच्या आजोबांचं शेवटचं बोलणं झालं होतं. जवळपास, 4:30 वाजताच्या सुमारास त्या दोघांमध्ये बोलणं झालं होतं. काही वेळानंतर, आजोबांनी पंकजच्या मोबाईल नंबरवर पुन्हा एकदा कॉल केला. मात्र, त्यावेळी त्याचा फोन बंद लागत होता. अखेर, दिल्लीत Bomb स्फोटात झाल्याची बातमी पंकजच्या कुटुंबियांना कळाली. त्यावेळी, घरच्यांनी संपूर्ण रात्र पंकजचा शोध घेतला, पण त्याबद्दल काहीच माहिती समजली नाही.
पंकजच्या कुटुंबियांमध्ये शोककळा
तसेच, मीडियाकडून या हल्ल्याबाबत प्रसारित झालेल्या एका कारच्या फोटोवरून पीडित कुटुंबियांना पंकजचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या बातमीमुळे पंकजच्या कुटुंबियांमध्ये तसेच, स्थानिकांमध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा: फरीदाबादमध्ये छापे अन् डॉ. उमर मोहम्मद भीतीने कापू लागला, जागेवर नवा कट रचला, तपासात मोठी माहिती समोर
ब्लास्ट होण्यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने i20 कारचा एक फोटो जाहीर केला होता, ज्यात i20 कार लाल किल्ल्याजवळील सुनहरी मशीदच्या जवळ पार्किंगमध्ये सुमारे 3 तास थांबलेली दिसून येत आहे. तसेच, ही कार दुपारी 3:19 वाजताच्या सुमारास पार्किंमध्ये दाखल झाली होती आणि सायंकाळी 6:48 वाजता पार्किंगमधून बाहेर पडली होती. त्यानंतर, त्या ठिकाणी भीषण स्फोट झाला.
हे ही वाचा: Delhi Bomb Blast चं पुलवामा कनेक्शन! सलमानने काश्मीरच्या तारिकला विकलेली i20 कार, अन्…
स्फोट एवढा तीव्र होता की, आसपासच्या अनेक वाहनांचे काच फुटले, गाड्यांना आग लागली, आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे काचेचे भागही तुटले. या प्रकरणात जम्मू-कश्मीर पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यात दोन डॉक्टरांचा डॉ. मुअजमिल अहमद गनई (फरीदाबाद) आणि डॉ. आदिल (कुलगाम) समावेश आहे.
ADVERTISEMENT











