Delhi Bomb Blast चं पुलवामा कनेक्शन! सलमानने काश्मीरच्या तारिकला विकलेली i20 कार, अन्…
दिल्लीतील कार स्फोटाच्या तपासात एक अतिशय गंभीर आणि खळबळजनक खुलासा झाला आहे. ज्या Hyundai i20 कारमध्ये स्फोट झाला तिची अनेकदा खरेदी विक्री झाली आहे. तसेच तिचे पुलवामा कनेक्शनही समोर येत आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्लीः दिल्लीतील कार स्फोटाच्या तपासात एक अतिशय गंभीर आणि खळबळजनक खुलासा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या Hyundai i20 कारमध्ये स्फोट झाला ती आतापर्यंत अनेक वेळा विकली गेली होती. याचबरोबर या कारचं पुलवामा कनेक्शनही समोर आलं आहे. राजधानी दिल्लीत झालेल्या या कार स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले आहेत.
खळबळजनक… स्फोट झालेली कारची झालीय अनेकदा विक्री!
तपास यंत्रणांना असे आढळून आले आहे की ही i20 कार अनेक वेळा खरेदी-विक्री करण्यात आली होती. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ती पुलवामा येथील रहिवासी तारिकला विकण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, कारच्या खरेदी-विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रे (Fake Documents) वापरली गेली होती, ज्यामुळे कारच्या खऱ्या मालकाची ओळख अद्याप अस्पष्ट आहे. या फसवणुकीमुळे स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्यांच्या हेतूंबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतं आहे.
यापूर्वी, ही कार हरियाणातील गुरुग्राम येथील रहिवासी सलमानची असल्याचे वृत्त होते, ज्याने ती विकली होती. ही कार गुरुग्राममध्ये नोंदणीकृत होती. 20 सप्टेंबर 2025 रोजी फरीदाबादमध्ये चुकीच्या पार्किंगसाठी कारला दंड देखील ठोठावण्यात आला होता.










