Premanand Maharaj: वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराजांकडे लोक मोठ्या संख्येने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या दृष्टीने पोहोचतात. नुकतंच, एका महिला भक्ताने त्यांना एक अतिशय चांगला प्रश्न विचारला. तिला चूक आणि पाप यातला खरा फरक काय आहे? आणि त्यांचे प्रायश्चित्त कसे करायचे? हे जाणून घ्यायचं होतं.
ADVERTISEMENT
प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं?
या प्रश्नाचं उत्तर देताना प्रेमानंद महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की, "चूक आणि पाप यातील मुख्य फरक म्हणजे आपला संकल्प आणि इच्छाशक्ती. जेव्हा कोणतंही काम विचार न करता, अचानक किंवा अजाणतेपणे केलं जातं आणि त्यामागे कोणताही हेतू किंवा पूर्व नियोजन नसतं, तेव्हा त्याला चूक म्हणतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही चालताना चुकून एखाद्याला धडकलात तर ती एक साधी चूक आहे कारण त्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता किंवा जाणूनबुजून कोणतीही कृती नव्हती."
हे वाचा: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर 5 जणांचा दुर्दैवी अंत
"याउलट, जेव्हा एखादी व्यक्ती जाणूनबुजून आणि स्वतःच्या इच्छेने कोणतंही चुकीचं काम करते तेव्हा त्याला पाप म्हणतात. याचाच अर्थ, विचारपूर्वक केलेले कोणतेही कृत्य, बरोबर आणि चूक ओळखून सुद्धा चुकीचा मार्ग निवडणे, हे पापाच्या श्रेणीत येतं. याउलट, चूक म्हणजे विचार न करता, नकळत किंवा निष्काळजीपणे घडणारी गोष्ट. चूक होताना कोणताच वाईट हेतू नसतो, मात्र पापमध्ये एखाद्या व्यक्तीचा स्वतःचा निर्णय आणि त्याच्या इच्छेचा समावेश असतो."
त्यांचं प्रायश्चित्त कसं कराल?
प्रायश्चित्ताच्या बाबतीत प्रेमानंद महाराज म्हणाले की, चूक असो की पाप दोघांचे उपाय आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, देवाचं नामस्मरण केल्याने कोणत्याही प्रकारची चूक किंवा पाप माफ होऊ शकतात. जेव्हा आपण देवाचं नाव जपतो, कीर्तन करतो आणि मनात भक्तीभाव ठेवतो, तेव्हा आपलं मन शुद्ध असतं आणि त्यामुळे मनाला शांती मिळते. त्यामुळे, व्यक्तीने सदैव देवाचं नामस्मरण करत राहणं आणि आपल्या वागण्यात अधिक चांगले बदल करणं, हे खरं प्रायश्चित्त आहे. यामुळेच, जीवन अधिक सुंदर आणि पवित्र बनू शकतं.
ADVERTISEMENT











