Shefali Jariwala Death: मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस 13' ची स्पर्धक शेफाली जरीवालाचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. वयाच्या 42 व्या वर्षी शेफालीचं कार्डिएक अरेस्टमुळे निधन झाल्याचं सांगितलं जात आहे. शेफालीचा अचानक मृत्यू झाल्यानंतर मनोरंजन विश्वातील कलाकरांना तसेच चाहत्यांना मोठा धक्का बसला. या दु:खद बातमीमुळे सिनेसृष्टीतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली.
ADVERTISEMENT
शेफालीचं निधन कशामुळे झालं?
रिपोर्ट्सनुसार, शेफालीला कार्डिएक अरेस्ट आला आणि त्यानंतर लगेच तीचा पती अभिनेता पराग त्यागीने तिला रुग्णालयात नेले. मात्र, हॉस्पिटमध्ये पोहचताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याचं कळालं. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स कधी येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री म्हणजेच 27 जून 2025 रोजी सुमारे 12:30 वाजता शेफालीचा मृतदेह अंधेरीमधील कूपर रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. कूपर रुग्णालयातील एएमओ (Assistant Medical Officer) यांनी सांगितल्याप्रमाणे, शेफालीचा मृतदेह दुसऱ्या हॉस्पिटलमधून तिथे आणण्यात आला होता. त्यामुळे मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आल्यानंतरच कळेल.
कूपर रुग्णालयात शेफाली जरीवालाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम सुरू आहे. दरम्यान, शेफालीचा पती पराग त्यागी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्यावेळी अतिशय दु:खी अवस्थेत परागने हात जोडून मीडियाकडे अपील केलं.
बिल्डिंगच्या वॉचमॅनने दिली माहिती
शेफालीच्या अचानक निधनामुळे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न डोके वर काढत आहेत. शेफाली राहत असलेल्या बिल्डिंगच्या वॉचमॅनने शेफालीच्या मृत्युसंबंधी काही डिटेल्स न्यूज एजंसीच्या मुलाखतीत शेअर केले. शेफालीला आपण बघितलं नसून तिची गाडी आल्यानंतर फक्त गेट उघडल्याचं वॉचमॅनने सांगितलं. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तिची गाडी आल्यानंतर मी गेट उघडला आणि त्यानंतर 1 वाजता शेफालीचं निधन झाल्याचं कळालं असल्याचं त्याने सांगितलं.
पोलिसांनी दिली माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफालीचा मृतदेह तिच्या अंधेरीमधील घरात सापडला. शुक्रवारी रात्री 1 वाजता अभिनेत्रीचं निधन झाल्याची माहिती कळाली. त्यानंतर त्यांनी कूपर रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी शेफालीचा मृतदेह पाठवण्यात आला. तिच्या मृत्यूचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
हे ही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बड्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग, लॉजवरील अश्लील व्हिडिओ व्हायरल
रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेफालीला शुक्रवारी रात्री सुमारे 11:15 वाजता रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, शेफालीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम सकाळी 11 वाजताच्या सुमारास सुरू झालं. पोस्टमॉर्टमच्या आधी पोलीस कूपर रुग्णालयात पोहोचली.
पोलिसांनी नोंदवला जबाब
मुंबई पोलिसच्या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री शेफाली जरीवालाचा पती पगार त्यागीचा जबाब नोंदवला. परागच्या घरीच पोलिसांकडून त्याचा जबाब नोंदवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शेफालीच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 4 लोकांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती अद्याप ठोस माहिती हाती लागलेली नाही.
हे ही वाचा: ग्राहकांनो! आजच सोनं खरेदी करा.. 24 कॅरेट सोन्याचे दर पुन्हा घसरले, आजचे गोल्ड रेट वाचून खुश व्हाल!
कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
शेफाली जरीवालाच्या निधनानंतर तिचा पती पराग त्यागी रुग्णालयातून बाहेर पडताना दिसला. त्यावेळी तो खूपच भावूक आणि दु:खी दिसत होता. शेफालीची आईसुद्धा तिला शेवटचं पाहण्यासाठी अगदी रडत रडत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. शेफालीच्या आईची अवस्था पाहून चाहत्यांचे सुद्धा डोळे पाणावले.
ADVERTISEMENT
