ग्राहकांनो! आजच सोनं खरेदी करा.. 24 कॅरेट सोन्याचे दर पुन्हा घसरले, आजचे गोल्ड रेट वाचून खुश व्हाल!

मुंबई तक

Today Gold Rate : जर तुम्ही सोन्याची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही वेळ योग्य असू शकते. मागील दहा दिवसात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे

ADVERTISEMENT

सोन्याचा दर: अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजने म्हटले आहे की अल्पकालीन सोन्याच्या किमती $३,६००-$३,८०० झोनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि त्यांनी स्विंग ट्रेडर्सना त्या पातळीवर नफा बुक करण्याचा सल्ला दिला आहे.
सोन्याचा दर: अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजने म्हटले आहे की अल्पकालीन सोन्याच्या किमती $३,६००-$३,८०० झोनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि त्यांनी स्विंग ट्रेडर्सना त्या पातळीवर नफा बुक करण्याचा सल्ला दिला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : जर तुम्ही सोन्याची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही वेळ योग्य असू शकते. मागील दहा दिवसात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 101000 रुपयांवर पोहोचले होते. आता पुन्हा या दरात घट होऊन आताचे भाव 97500 रुपये झाले आहेत. म्हणजेच एकूण 3500 रुपयांची घट झाली आहे.

28 जून 2025 म्हणजेच आज सोन्याच्या दरात 550 रुपयांची घट झाली आहे. बुलियन मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 97500 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 89300 रुपयांवर पोहोचली आहे. लग्न सोहळ्यात सोनं खरेदी करण्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. 

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 97570 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89450 रुपये झाले आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, डॉलर इंडेक्समध्ये मजबूती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने ही घट झाली आहे.  सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. चांदीच्या प्रति किलोग्रॅमचे दर 107800 रुपयांवर पोहोचले आहेत. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 107800 रुपयांवर पोहोचले आहेत. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 97420 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 89300 रुपये झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp