Video:नवरा कामावरून घरी आला अन् बायकोने लाथा बुक्यांनी धु धु धुतलं

मुंबई तक

• 04:45 PM • 08 May 2023

Wife beating Husband Video Viral :कामावरून घरी आलेल्या नवऱ्याला बायकोने धु धु धुतल्याची घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

wife beating husband after came home video viral

wife beating husband after came home video viral

follow google news

Wife beating Husband Video Viral :सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे.या व्हिड़िओमध्ये कामावरून घरी आलेल्या नवऱ्याला बायकोने धु धु धुतल्याची घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. (wife beating husband after came home video viral in social media)

हे वाचलं का?

व्हिडिओत काय?

व्हायरल व्हिडिओत (Viral Video) , एक तरूण कामावरून घरी परततो. कामावरून घरी परतल्यावर बायको त्याच्याजवळ धावत येऊन त्याच्याशी काही एक शब्द न बोलता, थेट धुलाई करायला सुरूवात करते. लाथा बुक्क्याने ती नवऱ्याची तुफान धुलाई करते.विशेष म्हणजे बायको एका सेकंद श्वासही न घेता त्याला मारहाण करते. या मारहाणीची संपूर्ण घटना घरातील कॅमेरात कैद झाली आहे.या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार महिलेचा नवरा हा कामावर जाण्यापु्र्वी कचरा टाकायला विरसला होता.तसेच तो साधारण 14 तासाची शिफ्ट करून घरी परतला होता.त्यामुळे वैतागलेल्या महिलेने नवरा घरी आल्या आल्या त्याची धूलाई केली. लाथा-बुक्यापासून तिने नवऱ्यावर हल्ला चढवला. या घटनेतील पुरूषाची अमानुष धुलाई पाहून अनेकांना त्याच्यावर दया येतेय.

हे ही वाचा : धीरेंद्र आचार्याच्या शिष्याचा प्रताप! कथेचं आयोजन करणाऱ्याच्या पत्नीलाच पळवलं

क्रेजी क्लिप्स नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअऱ करण्याता आला होता. या व्हिडिओवर 5.78 लाखाहून अधिक नागरीकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ 29 जानेवारी 2023 चा असल्याची माहिती आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. एका युझरने लिहले की, मी अशा महिलांना ओळखतो, माझ्या रोमॅंटीक जीवनात नाही, पण अशांना मी ओळखतो. त्या खुप विषारी असतात.दुसरा युझर लिहतो की, पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि पत्नीने रागाने पती घरी येताच मारहाण करायला सुरूवात केली. तिसऱ्य़ा युझरने लिहले की, मी अशा नात्यात राहिलो आहे. आणि काही बोलू शकलो नाही, कारण मला सांगण्यात आले की, स्त्रिया त्रास देत नाहीत. अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर येत आहेत.

हे ही वाचा : शेजाऱ्याकडून बायको राहिली गर्भवती; पतीने केलेलं कृत्य ऐकून पोलिसही झाले सुन्न

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

    follow whatsapp