बॉयफ्रेंडला दाखवायची जलवा, पत्नीने पाठवला तिच्या अश्लील चाळ्यांचा Video! पाहिल्यावर पतीने थेट...

Married Woman Shocking Viral News : रोहतक जिल्ह्यातील डोभ गावातील मगन उर्फ अजयने पत्नी आणि तिच्या प्रियकराला वैतागून 18 जूनला जीवन संपवलं.

Married Woman Shocking Viral News

Married Woman Shocking Viral News

मुंबई तक

23 Jun 2025 (अपडेटेड: 23 Jun 2025, 08:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीचा व्हिडीओ पाहून पतीने उचललं टोकाचं पाऊल

point

पतीनेही व्हिडीओ शेअर करत सर्वांना धक्काच दिला

point

त्या शेतात नेमकं घडलं तरी काय?

Married Woman Shocking Viral News : रोहतक जिल्ह्यातील डोभ गावातील मगन उर्फ अजयने पत्नी आणि तिच्या प्रियकराला वैतागून 18 जूनला जीवन संपवलं. आयुष्य संपवण्याआधी त्याने सोशल मीडियावर दोन व्हिडीओ पोस्ट करून स्वत:च्या मृत्यूला पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर दीपकला जबाबदार ठरवलं आहे. 

हे वाचलं का?

रोहतकच्या छोट्याशा गावात डोभमध्ये राहणारा मगन एक सामान्य शेतकरी होता. त्याच्या आयुष्यात सर्व काही ठीक सुरु होतं. पण त्याच्या लग्नाच्या दीड वर्षानंतर खळबळजनक सत्य समोर आलं. मगनला समजलं की, त्याची पत्नी दिव्याचं आधीही लग्न झालं  होतं आणि तिला एक मुलगाही होता. त्यानंतर मगनने दिव्याच्या पहिल्या पतीला पैसे देऊन नातं संपवण्यास सांगितलं. 

हे ही वाचा >> 11 महिला आणि 12 पुरुष... सुरू होतं भलतंच काही, पोलिसांची एंट्री अन् खेळच खल्लास...

मगनची पत्नी दिव्याचा सुरु झाला अफेअर अन् घडलं..

पण कालांतराने दिव्याच्या वागणुकीत बदल झाला. मगनला संशय येऊ लागला की, त्याच्या पत्नीचा दुसऱ्या वक्तीसोबत अफेअर सुरु आहे. दोघे मिळून त्याला मानसिक त्रास देत होते, असा आरोपही त्याने केला आहे.दीव्या आणि दीपक दोघेही मगनला मानसिक त्रास देत होते. एक दिवस तो गावाच्या शेतात गेला आणि एका झाडाला गळफास घेत जीवन संपवलं. पण मरणाच्या आधी त्याने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत त्याने पत्नी आणि प्रियकराचे कारनामे उघड केले. 

हे ही वाचा >> Personal Finance: बँक तुम्हाला देत नाही क्रेडिट कार्ड किंवा कर्ज, तर 'या' टिप्स ठरतील खूप भारी

व्हिडीओत मगनने म्हटलं, माझी पत्नी आणि तिचा प्रियकर मला खूप त्रास देतो. आता माझ्याकडे काही पर्याय उरला नाही. दरम्यान, मगनने रोहतकचे खासदार दीपेंद्र हुड्डा आणि महमचे आमदार बलराम दांगी यांनाही घडलेला प्रकार सांगितला. त्याने म्हटलं, माझा मृत्यू झाल्यानंतर माझा मुलगा माझ्या आई-वडिलांकडे राहूदे. मी तुम्हाला विनंती करतो की, माझ्या घरी जाऊन माझ्या वडिलांना सांगा की, माझा मुलगा नेहमीच त्यांच्यासोबत राहणार आहे. त्याने पोलिसांकडेही मागणी केली की, दीपक आणि दिव्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. 

प्रियकरासोबत डान्स करत होती अन्..

एक दिवस दिव्याने मगनला एक व्हिडीओ पाठवला. ज्यामध्ये ती दीपकसोबत डान्स करत होती. व्हिडीओत दोघेली अश्लील कृत्य करत असल्याचं मगनने पाहिलं. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर मगन खूप नैराश्यात आला. आता आयुष्यात काहीच बाकी राहिलं नाही, असा विचार त्याच्या मनात आला.
 

    follow whatsapp