थरकाप उडवणारा अपघात, ट्रकखाली महिलेचे दोन्ही पाय चिरडले गेले

हा अपघात घडला तेव्हा काही लोकांनी फोटो, व्हिडीओ काढले. त्यामध्ये दिसत असलेल्या दृष्यानुसार एवढा भीषण होता की, महिलेचे दोन्ही पाय हे ट्रकखाली दबून अक्षरश: चिरडले गेले होते.

Mumbai Tak

मुंबई तक

23 Jun 2025 (अपडेटेड: 23 Jun 2025, 09:40 AM)

follow google news

सातारा - कराड : पुणे-बंगळूरू महामार्गावरील मलकापूर फाटा येथे रस्ता ओलांडताना महिलेचा अपघात झाला. या अपघातात मंगल रामचंद्र महाडिक (वय 60) या महिलेच्या पायावर ट्रकचे चाक गेल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या. या अपघातात त्यांचे दोन्ही पाय गुडघ्यापासून चिरडले गेले. जखमी महिलेला तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>निवृत्त शिक्षकाला अर्ध्या कोटीला फसवलं...पैशांचा पाऊस आणि दुप्पट परताव्याच्या नादात कसा गंडा घातला?

मंगल महाडिक या महामार्ग ओलांडत असताना हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहन घटनास्थळी सोडून पलायन केले. मात्र, पीआरओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रक जप्त करून कराड शहर पोलीस ठाण्यात जमा केला. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतलं असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

थरकाप उडवणारे व्हिडीओ

हा अपघात घडला तेव्हा काही लोकांनी फोटो, व्हिडीओ काढले. त्यामध्ये दिसत असलेल्या दृष्यानुसार एवढा भीषण होता की, महिलेचे दोन्ही पाय हे ट्रकखाली दबून अक्षरश: चिरडले गेले होते. हे दृष्य पाहून तिथे उपस्थित अनेकजण हादरले. मात्र, सुदैवाने महिलेचा जीव वाचला, मात्र दोन्ही पाय चिरडले गेल्यानं प्रकृती गंभीर आहे. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हे ही वाचा >>"आई मी विष पिलंय, माझा मृतदेह 'इथून' घेऊन जा...", पुण्यात युवकानं स्वत:ला संपवलं, थरकाप उडवणारा घटनाक्रम

अपघाताची माहिती मिळताच पीएसआय चव्हाण, अमृत बाबर, चतुर साहेब, मार्शल रामचंद्र सरगर, आनंद लोळे, लावंड यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. ॲम्बुलन्सच्या साहाय्याने जखमी महिलेला रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुढील कारवाई सुरू आहे.

    follow whatsapp