Married Woman Shocking Viral News : उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका पतीने त्याच्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं. पतीने स्वत: पत्नीच्या कपाळावरील सिंदूर पुसलं आणि तिचं नातं प्रियकर शिवराजसोबत जोडलं. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण खोडारे ठाणे विभागातील एका गावातील आहे. 42 वर्षांच्या हरिश्चंद्रने आरोप केला आहे की, त्याची पत्नी करिष्मा (36) चा शिवराज चौहान नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. हरिश्चंद्रने दावा केला आहे की, त्याने स्वत:च त्याच्या पत्नीचं लग्न प्रियकरासोबत लावण्याचा निर्णय घेतला.
ADVERTISEMENT
लग्न जबरदस्ती झालं..,संबंध करण्यास नकार
करिश्माने आगळावेगळा दावा केला आहे. तिचं म्हणणं आहे की, तिचं लग्न जबरदस्ती करण्यात आलं. तिचं शिवराजसोबत कोणताही प्रेमसंबंध नाही. तिचा पतीसोबत वाद सुरु होता, असं करिष्माचं म्हणणं आहे. पण अनैतिक संबंधांबाबतची चर्चा चुकीची आहे. या लग्नानंतर करिष्मा तिच्या मुलीला सोबत घेऊन गेली. तर मुलगा हरिश्चंद्रजवळ आहे.
हे ही वाचा >> दुकानाजवळ लघवी केली म्हणून वाद, मटन कापण्याच्या सुऱ्याने भोसकून हत्या, संभाजीनगरमधील घटना काय?
पतीचा आरोप : पत्नीने दिलं होतं विष
हरिश्चंद्रने त्याची पत्नी करिष्मावर गंभीर आरोप लावले आहेत. तिचं म्हणणं आहे की, करिष्माने त्याला विष देण्याचा आणि मुलाल गुंगीचं औषध देण्याचा प्रयत्न केला. आता करिष्मासोबत कोणतंही नातं ठेवायचं नाहीय, असं हरिश्चंद्रचं म्हणणं आहे.
तक्रार दाखल केल्यास कारवाई होणार
याप्रकरणी खोडारी पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रमोद कुमार यांनी म्हटलंय, याप्रकरणी आतापर्यंत कोणतीही लेखी तक्रार देण्यात आली नाहीय. जर कोणी तक्रार दाखल केली तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.या घटनेमुळं संपूर्ण गावात चर्चा रंगली आहे. तर करिष्मा न्यायाची मागणी करत आहे. तिच्या मर्जीविरोधात हे सगळं झालं आहे, असं तिचं म्हणणं आहे.
हे ही वाचा >> सोबत फिरायला गेले आणि गाडीतच मित्राचा जीव घेतला... मुळशीतील हादरवून टाकणारी घटना काय?
ADVERTISEMENT
