नांदेडमधील जिल्हा परिषद शिक्षकाचा दारु पिऊन तुफान डान्स, प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई; पाहा व्हिडीओ

Zilla Parishad teacher suspended in Nanded for dancing wildly after drinking alcohol : शाळेतील शैक्षणिक वातावरण बिघडू नये म्हणून गटशिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक करून शाळेचे कामकाज सुरळीत सुरू केले आहे.

Zilla Parishad teacher suspended in Nanded

Zilla Parishad teacher suspended in Nanded

मुंबई तक

10 Dec 2025 (अपडेटेड: 10 Dec 2025, 03:45 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नांदेडमधील जिल्हा परिषद शिक्षकाचा दारु पिऊन तुफान डान्स

point

शाळेत गोंधळ घातल्याने निलंबनाची कारवाई

Zilla Parishad teacher suspended in Nanded for dancing wildly after drinking alcohol  : नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील शेखापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका शिक्षकाच्या गैरवर्तनामुळे ग्रामस्थ आणि पालक संतप्त झाले आहेत. शाळेतील शिक्षक अनंत वर्मा यांनी दारूच्या नशेत विद्यार्थ्यांसमोर नाचत अश्लील भाषा वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार एका पालकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला असून याबाबत सर्वांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय..

हे वाचलं का?

मुलांच्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी काही पालकांनी अचानक शाळेला भेट दिली

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत वर्मा हे अनेक दिवसांपासून शाळेत मद्यप्राशन करून येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांकडे केली होती. मुलांच्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी काही पालकांनी अचानक शाळेला भेट दिली असता, शिक्षक वर्मा हे दारूच्या नशेत गावकऱ्यांसमोर नाचताना आढळले. केवळ तेवढेच नाही, तर विद्यार्थ्यांसमोर गैरशब्द वापरत असल्याचेही दिसून आले. या प्रकारामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला.

हेही वाचा : मुंबई: सोलापूर–कल्याणदरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये 5 कोटींचे सोने लंपास! प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह...

शिक्षकांच्या अशा वर्तनामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा सवाल पालकांनी उपस्थित केला. “ज्यांच्या हातात मुलांचं शिक्षण आहे, तेच शिक्षक असे वागत असतील तर मुलांनी काय शिकायचं?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तातडीने कारवाईची मागणी केली. त्यानंतर हा सर्व प्रकार जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. व्हायरल व्हिडिओ आणि पालकांच्या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभागाने तत्काळ चौकशी सुरू केली. प्राथमिक चौकशीत आरोपांची खातरजमा झाल्यानंतर शिक्षक अनंत वर्मा यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शाळेतील शैक्षणिक वातावरण बिघडू नये म्हणून गटशिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक करून शाळेचे कामकाज सुरळीत सुरू केले आहे. पुढील चौकशीदरम्यान संबंधित शिक्षकावर कठोर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिली.

शेखापूर ग्रामस्थ आणि पालकांनी जिल्हा परिषदेच्या जलद कारवाईचे स्वागत केले असून, अशा घटनांवर कठोर पावले उचलली नाहीत तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला आणि शिक्षणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पंढरपूर : शेवाळावरुन पाय घसरुन 5 वर्षीय चिमुकला शेततळ्यात पडला, वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचाही मृत्यू

    follow whatsapp