कोल्हापुरात FIFA World Cup 2026 चा उत्साह शिगेला, मेस्सी अन् रोनाल्डोचे भव्य कटआऊट्स

कोल्हापुरात FIFA World Cup 2026 चा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून येत आहे. फुटबॉलप्रेमी कोल्हापुरकरांनी Lionel Messi आणि Cristiano Ronaldo यांचे तब्बल 60 फुटांचे भव्य कटआऊट उभारलेत. फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं.

मुंबई तक

15 Jun 2026 (अपडेटेड: 15 Jun 2026, 03:45 PM)

follow google news

FIFA World Cup 2026 चा उत्साह कोल्हापुरात शिगेला पोहोचलेला दिसून येत आहे. फुटबॉलप्रेमी कोल्हापुरकरांनी Lionel Messi आणि Cristiano Ronaldo यांचे तब्बल 60 फुटांचे भव्य कटआऊट उभारलेत. कोल्हापुरात चौकाचौकात फुटबॉलचा जल्लोष पाहायला मिळतोय. शहरातील विविध मंडळे आणि क्लब World Cup साठी सज्ज झालेत. फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं. कोल्हापूरची सॉकर सिटी अशी ओळख असून सुमारे 120 फुटबॉल क्लब आहेत. यापैकी 1500 हून अधिक खेळाडू फुटबॉल या खेळाशी जोडले गेलेले आहे. 

हे वाचलं का?

कोल्हापूर शहरात कुस्तीप्रमाणे आता फुटबॉलची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. फुटबॉल चाहत्यांचा मोठा वर्ग कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतो. फीफा वर्ल्ड कपच्या निमित्ताने शहरात मोठा उत्साहाचा जागर मांडलाय.