जळगाव : अडीच महिन्यानंतर पुरलेला मृतदेह बाहेर काढला, 12 वर्षीय मुलासोबत काय घडलं?

jalgaon crime news : जळगावात क्रिकेट खेळताना मृत्यू झालेल्या 12 वर्षीय मुलाची हत्या झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मुंबई तक

04 Jun 2026 (अपडेटेड: 04 Jun 2026, 02:35 PM)

follow google news

jalgaon crime news : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे क्रिकेट खेळताना गणेश नवल पाटील या 12 वर्षीय मुलाचा झालेला मृत्यू सध्या अत्यंत संशयास्पद स्थितीत चर्चेत आला आहे. ही दुर्दैवी घटना 15 मार्च रोजी घडली होती, तेव्हा क्रिकेट खेळताना गणेशचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मुलाच्या वडिलांना या घटनेबाबत कोणताही विश्वास वाटला नाही आणि हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. वडिलांच्या आक्रमकपणामुळे
आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले.

हे वाचलं का?

हेही वाचा : कोल्हापूर : प्रियकराने व्हिडीओ काढले, अन् लॉज, झाडी, कारमध्ये चौघांनी अब्रू लुटली

अडीच महिन्यांनी पुरलेला मृतदेह काढला बाहेर 

मुलाच्या मृत्यूच्या कारणाबाबत वडिलांनी उपस्थित केलेल्या शंकेमुळे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे न्यायासाठी धाव घेतली. दीड महिन्याहून अधिक काळ वडिलांनी आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत लढा दिला. वडिलांचा असा थेट आरोप होता की, काही मित्रांनी जुन्या वादातून गणेशच्या मानेवर बॅटने हल्ला केला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : बीड : सिनेमाला लाजवेल असा कट! मर्डर मिस्ट्रीचा पोलिसांकडून उलगडा

प्रकरण तडीस नेण्यासाठी अडीच महिन्यांनंतर प्रशासनाने गणेशचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. फॉरेन्सिक पथक, पोलीस आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. मृतदेह बाहेर काढल्यानंतरचे दृश्य पाहून गणेशचे वडील नवल पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. पंचनाम्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.