AAP MP Sanjay Singh : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह हे बिहारमध्ये नीट पेपर लीकसंबंधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्याचवेळी त्याठिकाणी पोलीस पोहोचले. त्याचसंबंधीचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये पोलिसांसोबत जे भांडत आहेत ते आहेत आपचे खासदार संजय सिंह. नीट पेपरफुटीवरुन वातावरण तापलं असताना यूपीच्या प्रयागराजमध्ये जे घडलंय त्याची आता चर्चा होतेय. प्रयागराजच्या सर्किट हाऊसमध्ये खासदार संजय सिंह विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
ADVERTISEMENT
'पेपरफुटी'च्या घटना, भरती परीक्षांमधील अनियमितता आणि तरुणांचे भविष्य हे या चर्चेचे मुख्य विषय होते. मात्र याठिकाणी पोलीस दाखल झाले आणि चर्चेला वेगळं वळण मिळालं. ADM सत्यम मिश्रा आणि डीसीपी मनीष कुमार शांडिल्य यांनी या कार्यक्रमात 'पेपरफुटी'च्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर आक्षेप घेतला आणि ती थांबवण्याची मागणी केली, असं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT










