सावत्र आई-मुलाच्या अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट; नेमकं काय घडलं?

Beed Crime News : सावत्र आई आणि मुलाने अनैतिक प्रेमसंबंधातून दोघांनाही आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराचा विष प्राशनाने मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईनेही गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

मुंबई तक

29 May 2026 (अपडेटेड: 29 May 2026, 03:52 PM)

follow google news

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील केज आणि अंबाजोगाई परिसरातून नातेसंबंधांना काळीमा फासणारी एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सावत्र आई आणि 21 वर्षीय मुलाच्या अनैतिक प्रेमसंबंधांचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला आहे. समाजात बदनामी होईल, या भीतीने  मुलाने अंबाजोगाई येथे विष प्राशन केले. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आपल्या प्रियकर असलेल्या सावत्र मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्का ही महिला सहन करू शकली नाही. अखेर हतबल झालेल्या सावत्र आईनेही गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

हे वाचलं का?

हेही वाचा : विधानपरिषद निवडणूक : महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर, कोण किती जागा लढणार?

पोलीस तपासातून सगळं उलगडलं; परिसरात खळबळ

हे दोघेही घरातून पळून तेलंगणामध्ये गेले होते, त्यामुळे पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी मोबाईल ट्रॅकिंगच्या मदतीने त्यांना शोधून ताब्यात घेतले होते. दरम्यान, दोघेही घरी परतल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी या दुहेरी आत्महत्येची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. सावत्र आई आणि मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्व जिल्ह्यात या घटनेची चर्चा सुरु आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 


बाप मुलीच्या सासरी गेला अन् हादरलाच, सहा महिन्यांपूर्वीच सगळं संपलं होतं; दोषी कोण?