'पोरांच्या शाळेची फी भरायलाही पैसे नाहीत..' कांदा शेतकऱ्यांच्या व्यथा, जाणून घ्या सविस्तर

सामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने आज राबणाऱ्या शेतकऱ्याच्याच नशिबात कसे रडू आणले आहे. त्याविषयीचा हा ग्राउंड रिपोर्ट.

मुंबई तक

• 12:22 PM • 28 May 2026

follow google news

 

हे वाचलं का?

Onion Farmer in Maharashtra : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कमालीच्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना, बाजारात मात्र कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी तोट्यात चालला आहे. सध्या कांद्याला जास्तीत जास्त प्रति किलो केवळ 14 रुपये इतकाच दर मिळत आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती किती भीषण आणि दयनीय झाली आहे, याचा पुरावा देणारी आणि अत्यंत चीड आणणारी घटना समोर आली आहे.

एका महिला शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून शेतात 41 पिशव्या कांदा पिकवला. मात्र, बाजारपेठेत तो विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता त्या माऊलीच्या हातात केवळ 2 रुपये आले! हे दोन रुपयांचे बिल हातात आल्यानंतर त्या महिला शेतकऱ्याला आपले अश्रू अनावर झाले. "कांदा पिकवून आम्ही पूर्णपणे घाट्यात (तोट्यात) गेलो आहोत, आता पोरांच्या शाळेची फी भरायलाही आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत," अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे. सामान्य जनतेच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने आज राबणाऱ्या शेतकऱ्याच्याच नशिबात कसे रडू आणले आहे, पाहा हा सविस्तर आणि डोळे उघडणारा ग्राउंड रिपोर्ट.