Pandharpur Farmer gorakshak News : सोलापुरात शेतकऱ्यांच्या गाडीला 'कथित' गोरक्षकांनी अडवून गुंडगिरी केल्याचा आरोप होतोय.बीडमध्ये बैल खरेदी करून सांगोल्याला निघालेल्या शेतकऱ्यांच्या गाडीला 'कथित' गोरक्षकांनी अडवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, न्यायालयाने हे बैल पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. आपल्या कष्टाचे बैल पोलिसांच्या कोठडीत गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.गोरक्षकांनी दमदाटी करत खिलार जनावर पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यानंतर गुन्हा दाखल होताच शेतकऱ्याने हकीकत सांगितली. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बैलांचे हाल होत असल्याचास आरोपही शेतकऱ्याने केलाय.
ADVERTISEMENT
याविषयी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ यांनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की शेतकऱ्याची बैल तुरुंगात टाकली गेली आहेत. सत्ता ही जातीपातीतून मिळते, मातीतून मिळत नाही, असा आभास सरकारला झाला आहे. तुम्हाला फक्त जातीपातींची मतं हवी आहेत का? शेतकऱ्यांची मतं नको आहेत का? शेतकऱ्यांच्या गोट्यात हात घालू नका, नाहीतर हे तुम्हाला महागात पडेल!"
ADVERTISEMENT










