आयटी इंजिनिअर तरुणीचं चप्पल विक्रेत्याशी सूत, 'तरूणानं वापर करत नको तेच...'

Pune Crime : पुण्यातील उच्चशिक्षित असलेल्या आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली. तपासातून समोर आले की, तरुणीचे एका चप्पलविक्रेत्याशी प्रेमसंबंध होते. नंतर चप्पल विक्रेत्या मुलाने तरुणीची फसवूक आणि वापर केल्याचं संबंधित तरुणीचं म्हणणं होतं, नेमकं काय घडलं जाणून घ्या.

मुंबई तक

• 12:52 PM • 28 May 2026

follow google news

Pune Crime : पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील उच्चशिक्षित असलेल्या आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली. तपासातून समोर आले की, तरुणीचे एका चप्पलविक्रेत्याशी प्रेमसंबंध होते. नंतर चप्पल विक्रेत्या मुलाने तरुणीची फसवूक आणि वापर केल्याचं संबंधित तरुणीचं म्हणणं होतं. तिने आपल्या कुटुंबीयांनी याबाबतची माहिती देऊन फोनवर कुटुंबीयांशी बोलल्यानंतर तरुणीने टोकाचं पाऊल उचललं. मुठा नदीपात्रात तिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, पीडितेने आपल्या प्रियकराने फसवले आणि नंतर वापर केल्याचा आरोप केला होता, मात्र नंतर यावर कसलाही विचार करू नको अशी तिच्या भावाने तिला समजूत घातली, पण नंतर जे व्हायला नको तेच घडलं. तिने मुठा नदीत उडी मारत जीवन संपवलं. मृतदेह नदीत आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, प्रियकराने फसवणूक केल्यानेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संशयित आरोपी चप्पल विक्रेत्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.