SIR प्रक्रिया राबवण्याचे अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहेत. आधीपेक्षा वेगळ्या पद्धतीने जरी ही प्रक्रिया राबवण्याते येत असली तरी ती कायद्याच्या चौकटीत बसणारी असेल तर कोर्ट आयोगाला ती प्रक्रिया राबवण्यापासून थांबवू शकत नाही. असं सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने भारतात निवडणूक प्रक्रिया कशी राबवावी याबाबत संविधानाला अपेक्षित असल्याप्रमाणेच ही प्रक्रिया दिसतेय. असंही मत कोर्टाने यावेळी नोंदवलं आहे.
ADVERTISEMENT
सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलंय की SIR प्रक्रियेमुळे लोकशाही मूल्यांनुसार फ्री अँड फेअर पद्धतीने निवडणुका पार पडतील. निष्पक्ष निवडणुका या केवळ मतदान प्रक्रियेपुरता मर्यादित नसून मतदार याद्यांमधील अचूकताही महत्वाची असते, या मतदारयाद्या, दोषविरहित असणं म्हणजेच फ्री अँड फेअर इलेक्शन.
ADVERTISEMENT










