जरांगेंच्या आंदोलनावरुन लक्ष्मण हाके आक्रमक, सरकारला दिला 'हा' इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच जरांगे यांचं आंदोलन स्क्रिप्टेड असल्याचाही खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

मुंबई तक

01 Jun 2026 (अपडेटेड: 02 Jun 2026, 11:16 AM)

follow google news

Laxman Hake aoan Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केलं. यावेळी त्यांनी भर उन्हामध्ये आंदोलन केलं. रात्री 1 वाजताच्या सुमारास सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत त्यांचं उपोषण सोडवलं. आता या सगळ्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले आहेत, त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे.

हे वाचलं का?

जरांगे यांच्या आंदोलनाचे मुख्य कारण मराठा समाजासाठी आरक्षण, नोकऱ्या आणि इतर प्राधान्यांच्या मुद्द्यावर सरकारने तोडगा  काढावा असा होता. सरकारने याच मुद्द्यांवरून सकारात्मकपणे निर्णय घेण्यावरून आश्वासन दिले आहे. एवढंच नाही,तर आरक्षणाच्या मुदतीवरून आणि गुन्हे मागे घेण्यावरून देखील मागण्या केल्या होत्या.  

यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला धारेवर धरलं. जरांगेंचे आंदोलन हे कुणाचा तरी पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी होतं असा आरोप त्यांनी केला. तसेच  बोगस कुणबी प्रमाणपत्रे दिल्यास कायदा हातात घेऊ, तहसीलदार कार्यालयांवर आंदोलन करू. जर ओबीसी आरक्षणाला धक्का बसल्यास राज्यव्याप्ती आंदोलन करू, असं लक्ष्मण हाके म्हणाले.