धनंजय देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन? हत्येचा गुन्हा नोंदवला पण...

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या विरोधात केलेली जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई तक

01 Jun 2026 (अपडेटेड: 01 Jun 2026, 03:58 PM)

follow google news

बीड: मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली जीवे मारण्याची तक्रार प्राथमिक तपासात खोटी असल्याचे समोर आले आहे.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

समाधान खिंडकर यांनी तक्रार केली होती की, हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर धनंजय देशमुख यांनी अंगरक्षकाची बंदूक त्यांच्या डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिली.

या तक्रारीच्या आधारे देशमुख यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस तपासात काय निष्पन्न झालं?

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले.

तपासात तक्रारीत वर्णन केल्याप्रमाणे बंदूक डोक्याला लावल्याचा प्रकार घडल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत.

त्यामुळे समाधान खिंडकर यांची तक्रार तथ्यहीन असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

धनंजय देशमुख यांची भूमिका

तक्रार खोटी असल्याचे समोर आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी आपल्याविरोधात राजकीय आणि वैयक्तिक द्वेषातून कट रचला गेल्याचा आरोप केला.

सत्य समोर आल्याने न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणांवर विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, खोट्या तक्रारींचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.