देशभर गाजत असलेल्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासातून रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली असून, राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेतून (NTA) फुटलेला प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचली याची संपूर्ण साखळी तपास यंत्रणांनी उघड केली आहे.
ADVERTISEMENT
तपासानुसार, पेपर लीक झाल्यानंतर तो विविध एजंट्स आणि मध्यस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. या रॅकेटमध्ये लातूरमधील काही शैक्षणिक केंद्रे आणि कोचिंग क्लासेसचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
लातूरमधील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरूरे यांच्या फ्लॅटवर चालणारे प्रा. प्रल्हाद कुलकर्णी यांचे क्लासेस तसेच शिवराज मोटेगावकर यांची कथित 'प्लॅटिनम गोल्ड बॅच' सीबीआयच्या रडारवर आली आहे. या बॅचसाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे शुल्क आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. याच सगळ्याची 'Inside Story' आता समोर आली आहे.
दरम्यान, सीबीआय आता या संपूर्ण नेटवर्कमागील सूत्रधार, आर्थिक व्यवहार आणि पेपरफुटीच्या साखळीतील प्रत्येक दुव्याचा शोध घेत आहे. या प्रकरणामुळे NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
ADVERTISEMENT










