विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर, पाहा कोणा-कोणाला संधी?

BJP announces list of candidates for legislative council : भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादीत एक दिवसापूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या प्राजक्त तनपुरे यांचाही समावेश आहे.

मुंबई तक

01 Jun 2026 (अपडेटेड: 01 Jun 2026, 12:22 PM)

follow google news

BJP announces list of candidates for legislative council : विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील जागांसाठी भाजपने आपली पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. भाजपने 11 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, यात अरुण लखाणी आणि प्राजक्त तनपुरे यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. महायुतीमधील जागावाटपाच्या सूत्रानुसार, भाजप 11 जागांवर, शिवसेना (शिंदे गट) 4 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 2 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : पुणे : दारु पिऊन आलेल्या महिलेचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा VIDEO

निवडणुकीचे वेळापत्रक आणि मतदान प्रक्रिया

या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना 25 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून 2026 आहे. अर्जांची छाननी 2 जून रोजी होणार असून, 4 जूनपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. अंतिम मतदानाची तारीख 18 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे, तर 22 जून 2026 रोजी मतमोजणी पार पडेल. या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधी मतदान करणार असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीतीवर लक्ष केंद्रित केले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले असून, महायुतीमधील सर्व घटक पक्ष विजयासाठी प्रयत्नशील आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आधी गोड-गोड बोलली अन् नंतर घरी बोलवून केलं कांड, तरुणासोबत घडलं भयानक