सख्ख्या काकाने प्रायव्हेट पार्ट कापून केली पुतण्याची हत्या, तेही लग्नाच्या 2 दिवस आधी..

मुंबई तक

• 03:43 PM • 30 Jun 2023

काकाने आपल्या मुलांच्या साथीने सख्ख्या पुतण्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायत घटना उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये घडली. ज्याप्रकरणी आता आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Mumbaitak
follow google news

Crime News: कानपूर: उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये घडलेली एका घटनेने एकच खळबळ माजली आहे. एका तरूणाला आपल्या चुलत भावाने लग्न करावे असे वाटत नव्हते. त्यामुळेच त्याने भावाच्या लग्नाच्या अवघ्या 2 दिवस आधी त्याचे गुप्तांग कापून त्याची हत्या (Murder) केली होती. हे हत्याकांड घडवून आणणाऱ्यांना त्याने तब्बल दोन लाख रुपयांची सुपारीही दिली होती. कानपूरमध्ये 20 दिवसांपूर्वी झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला अटक करून हा खुलासा केला आहे. (2 days before marriage young man murdered cutting private part uncle brother masterminds crime news)

हे वाचलं का?

प्रत्यक्षात 8 जून रोजी सकाळी शहरातील घाटमपूर परिसरात प्रमेंद्र नावाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. गुप्तांग कापून त्याची हत्या करण्यात आली होती. प्रमेंद्रचे 10 जून रोजी लग्न होणार होते आणि 7 तारखेलाच तो घरातून गायब झाला होता. पोलिसांच्या तपासात प्रमेंद्र हा हळदी समारंभ आटोपून घराबाहेर गेला होता व त्यानंतर घरी परतला नसल्याचे निष्पन्न झाले होते. 8 जून रोजी सकाळी त्यांचा गुप्तांग कापलेला मृतदेह आढळून आला होता.

हे ही वाचा>> BMC : ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी, पण ‘या’ गोष्टी पाळाव्या लागणार; पोलिसांचा इशारा काय?

प्रमेंद्रकडे होती कोट्यवधींची जमीन

प्रमेंद्रचा खून हा अनैतिक संबंधांमुळे झाला असावा असा संशल पोलिसांनी होता. खरं तर हा प्राथमिक अंदाज होता. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. अनेक दिवसांच्या तपासानंतरही प्रमेंद्रचे कोणाशीही अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना आढळून आले नाही. फोन डिटेलमध्येही त्याचे शेवटचे बोलणे त्याच्या भावी पत्नीशी झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात दुसऱ्या पद्धतीने तपास करण्याचं ठरवलं. तेव्हा असं आढळून आले की, मृत प्रमेंद्रच्या आई-वडिलांचा अनेक वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता आणि त्यामुळे त्याच्या नावावर कोट्यवधी रुपयांची संपत्ती होती.

काका आणि चुलत भावांनी केला खून

प्रमेंद्रच्या हत्येनंतर त्याचा चुलत भाऊ घरातून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून प्रमेंद्रच्या काकांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता, काकाने आपल्या मुलांसह प्रमेंद्रची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली.

हे ही वाचा>> Dhule: ठाकरे गटाच्या महिलांनी बँक मॅनेजरला झोडपलं, कॉलर धरुन…

प्रमेंद्रच्या नावावर कोट्यवधींची जमीन असल्याचे त्याचे काका राजबहापूर यांनी पोलिसांना सांगितले. आम्हाला ती जमीन बळकवायची होती त्यामुळे मी माझ्या मुलांसह त्याच्या हत्येचा कट रचला आणि त्याच्या लग्नाच्या दोन दिवस आधी 2 लाख रुपये देऊन प्रमेंद्रची हत्या केली. आरोपी काकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुपारी घेऊन खून करणाऱ्या बबलू आणि सुनील या मारेकऱ्यांना देखील अटक केली आहे.

उर्वरित चौघांचा शोध सुरू

या प्रकरणाबाबत डीसीपी रवींद्र कुमार म्हणाले की, मालमत्तेसाठी तरुणाची हत्या त्याच्या काका आणि चुलत भावांनी केली आहे. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी अद्यापही फरार आहेत. ज्यांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

    follow whatsapp