Crime News: एका 4 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित घटना ही केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील मुक्कम परिसरात घडल्याची माहिती आहे. 22 वर्षीय मुहम्मद मिथिलाज अशी आरोपी तरुणाची ओळख समोर आली आहे. घटनेतील पीडिता अंगणवाडीत शिकत असून तिने तिच्या शिक्षिकेला याबद्दल सांगितल्यानंतर, हे प्रकरण समोर आलं.
ADVERTISEMENT
प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचं सांगितलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिथिलाजचं त्याच्या मित्राच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. मात्र तो त्याच्या मित्राच्याचं बहिणीसोबत असं घृणास्पद कृत्य करेल, याची घरातील कोणालाच कल्पना नव्हती. एके दिवशी, पीडिता अंगणवाडीत गेल्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असल्याचं तिने तिच्या शिक्षिकेला सांगितलं. संबंधित शिक्षिकेने मुलीची विचारपूस केल्यानंतर पीडितेने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल सांगितलं.
हे ही वाचा: बारामती हादरली, तरुणीची क्रूरपणे हत्या करुन बॉडी रस्त्याच्या कडेला फेकली, नग्न अवस्थेत आढळला मृतदेह
"मोठ्या दादाने केलं घृणास्पद कृत्य..."
आपल्या घरी सतत येत असलेल्या मोठ्या दादाने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केल्याचं मुलीने शिक्षिकेला सांगितलं. त्यानंतर, पीडितेच्या शिक्षिकेने आधी तिच्या पालकांना आणि नंतर पोलिसांना या प्रकरणाबाबत सांगितलं. मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपी मुहम्मद मिथिलाजला वायनाड येथून अटक केली.
हे ही वाचा: प्रेम विवाह केला पण पत्नीचे इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध, लग्नाच्या 4 महिन्यांनंतर गळा दाबून संपवलं
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असतानाच उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एका 10 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडितेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. मुलगी नेहमीप्रमाणे तिच्या शाळेत जात असताना वाटेत एका व्यक्तीने तिच्याजवळ कार थांबवून तिला बळजबरीने गाडीत ओढलं. आरोपीने मुलीला सुमारे दोन तास ओलीस ठेवलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT











