"मी ट्रेनमधून उडी मारेन हा..." प्रेयसीची धमकी, संतापलेल्या प्रियकराने थेट ट्रेनमधून तिला ढकललं; शरीराचे तुकडे झाले अन्...

पाणी पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं. यामुळे, ट्रेनने धडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

 प्रियकराने थेट ट्रेनमधून प्रेयसीला ढकललं

प्रियकराने थेट ट्रेनमधून प्रेयसीला ढकललं

मुंबई तक

• 05:24 PM • 06 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

"मी ट्रेनमधून उडी मारेन हा..." प्रेयसीची धमकी

point

संतापलेल्या प्रियकराने थेट ट्रेनमधून ढकललं

Crime News: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाणी पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीला चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं. यामुळे, ट्रेनने धडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच, पोलिसांनी आरोपी प्रियकराला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली. अखेर, कठोर चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

प्रेयसीला चालत्या ट्रेनमधून ढकललं... 

संबंधित घटना बरेली सिटी रेल्वे स्टेशनवर घडली. स्टेशन अधीक्षकांनी ही बाब जीआरपीला कळवली. माहिती मिळताच जीआरपी पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 5:40 च्या सुमारास ही घटना घडली. ट्रेनमधून प्रवास करताना रुखसाना आणि तिच्या प्रियकरामध्ये पाणी पिण्यावरून वाद झाला. पुढे हा वाद इतका टोकाला पोहोचला की रुखसानाने ट्रेनमधून उडी मारण्याची धमकी दिली. प्रेयसीच्या वागण्यामुळे संतापलेल्या प्रियकराने तिला चालत्या ट्रेनमधून ढकललं. ट्रेनमधून पडल्यानंतर, पीडितेला दुसऱ्या ट्रेनने धडक दिली आणि तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले. 

या घटनेनंतर, पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कठोर चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींने पोलिसांना सांगितलं की, "आमच्यात पाणी पिण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी माझी प्रेयसी मला सतत ट्रेनमधून उडी मारण्याची धमकी देत होती आणि म्हणूनच मी शेवटी तिला ट्रेनमधून ढकललं. 

हे ही वाचा: Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत... कोणाला काय मिळालं?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला रुखसाना मध्य प्रदेशातील भोपाळची रहिवासी असल्याची माहिती आहे. ती बऱ्याच दिवसांपासून तिचा पती इरफान याच्यापासून वेगळी राहत होती. रुखसानाला दोन मुले असून सध्या ती त्यांच्या आजोळी राहत असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रुखसाना बऱ्याच काळापासून मैनपुरीच्या किशनी परिसरातील रहिवासी असलेल्या एका तरुणासोबत बरेली येथे राहत होती. खरं तर, त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू असल्यामुळे ते एकमेकांसोबत राहत होते. 

हे ही वाचा: अनैतिक संबंध, ब्लॅकमेलिंग आणि पैशांची मागणी! महिला शेतकरी नेत्याच्या हत्येने खळबळ, नेमकं काय घडलं?

हे दोघेही वैयक्तिक कामासाठी बदायूला गेले होते. गुरुवारी ते 55307 कासगंज-रामनगर पॅसेंजर ट्रेनने बरेलीला परतत होते. ट्रेनमध्ये त्यांच्यात एकमेकांसोबत वाद सुरू झाले. या घटनेनंतर, जीआरपीने महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. रुखसानाच्या कुटुंबियांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीय आल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. 

    follow whatsapp