Murder Case: दिल्लीतील रोहिणी परिसरात एक व्यक्तीला त्याच्या पत्नी आणि सासूची निर्घृणपणे हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. NDTV च्या वृत्तानुसार, शनिवारी (30 ऑगस्ट) आपल्या मुलाच्या वाढदिवशी गिफ्ट एक्सचेंजवरून दोन्ही पक्षात वाद झाला आणि या भांडणात आरोपीने त्याच्या पत्नी आणि सासूची निर्घृणपणे हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
रिपोर्टनुसार, ही घटना रोहणी सेक्टर-17 मध्ये घडली. हत्येप्रकरणी केएनके पोलिसांना दुपारी कॉलवरून सूचना मिळाली. महिती देणाऱ्याने पोलिसांना त्याची आई आणि बहिणीची हत्या झाल्याचं सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यावेळी त्यांना कुसुम सिन्हा (63) आणि त्यांची मुलगी प्रिया सहगल (34) यांचा मृतदेह खोलीत आढळला.
पार्टीच्या दरम्यान पती आणि पत्नीमध्ये वाद
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुमचा मुलगा मेघ सिन्हाने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्याने सांगितलं की, 28 ऑगस्ट रोजी कुसुम आपल्या नातूचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रियाच्या घरी गेली होती. पार्टीच्या दरम्यान, प्रिया आणि तिचा पती योगेश यांच्यामध्ये गिफ्टच्या कारणावरून वाद झाला. दोघांमधील हे भांडण मिटवण्यासाठी कुसुम प्रियाच्या घरी थांबली होती.
हे ही वाचा: सात वर्षांपासून पती बेपत्ता! नंतर रील्समध्ये दुसऱ्याच महिलेसोबत दिसला अन्... पत्नीसमोर आलं धक्कादायक सत्य..
पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 30 ऑगस्ट रोजी मेघ आपल्या आईशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता मात्र, त्यावेळी त्याला काहीच उत्तर मिळालं नाही. त्यामुळे तो प्रियाच्या घरी गेला आणि फ्लॅट बाहेरून बंद असून तिथे रक्ताचे डाग त्याला आढळले.
रक्ताच्या थारोळ्यात पत्नी आणि सासूचा मृतदेह
अशा परिस्थितीत, मेघने कुटुंबातील इतर सदस्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर घराचं कुलूप तोडून त्यांनी आत पाहिलं तर कुसुम आणि प्रियाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याचं आढळलं. पोलिसांनी सांगितलं की प्रियाच्या पतीनेच प्रिया आणि कुसुमची हत्या केली असून तो नंतर मुलांना घेऊन पळून गेल्याचा आरोप मेघने केला.
हे ही वाचा: शेतातच होत्या दोन मोठ्या खोल्या, ‘त्या’ लोकांचं सतत येणं जाणं अन्... पोलिसांनी धाड टाकताच झाला पर्दाफाश!
पोलिसांचा तपास
प्रकरणातील आरोपी योगेशला केएनके मार्ग पोलिसांनी अटक केली असून घटनेच्या वेळी रक्ताने माखलेले कपडे आणि हत्या करताना वापरण्यात आलेली कात्री पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कौटुंबिक वाद हेच हत्येमागचं कारण असल्याचं समोर आलं आहे. क्राइम टीम आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलवण्यात आलं असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
