Crime News: आजच्या काळात सुद्धा, महिलांवर लैंगिक अत्याचाराचं वाढतं प्रमाण पाहायला मिळतंय. कठोर सुरक्षाव्यवस्था असूनही बलात्काराच्या बऱ्याच घटना घडल्याच्या बातम्या समोर येत असतात. कर्नाटतच्या कोप्पल जिल्ह्यातील मदलूर गावातून अशीच एक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. येथे, एका 39 वर्षीय महिला होमगार्डसोबत नराधमांनी घृणास्पद कृत्य केल्याची माहिती आहे. पीडितेच्या ओळखीच्या एका पुरुषाने तिची फसवणूक करत तिला दारू पाजली आणि त्याच्यासह चार आरोपींनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
ADVERTISEMENT
चार जणांनी केला सामूहिक बलात्कार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कुश्टगी शहरात तिच्या नातेवाईकांना भेटायला गेली होती. त्यानंतर, पीडितेच्या ओळखीची लक्ष्मण केंचप्पा करगुली नावाची व्यक्ती तिला बाईकवर बसवून एका निर्जन ठिकाणी घेऊन गेली. प्राथमिक तपासावरून, पीडिता आणि आरोपी एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याचं समोर आलं. पीडितेने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की, आरोपी लक्ष्मणने तिला ज्यूस असल्याचं सांगून दारू पाजली आणि नंतर, चार जणांनी मिळून पीडितेवर बलात्कार केला.
हे ही वाचा: कंपनीतील सहकाऱ्याकडून निर्घृण हत्या! रात्री मुंबईतील 'त्या' कंपनीत घडली भयानक घटना...
पीडितेने पोलिसांना फोन करून दिली माहिती
घटनेनंतर, पीडितेने कसंबसं पोलिसांच्या इमरजेन्सी रिस्पॉन्स सपोर्स सिस्टमला फोन केला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेला गंभीर अवस्थेत येलबुर्गाच्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी नेलं. मात्र, पीडितेची प्रकृती आणखी खालावत गेली. त्यानंतर, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला कोप्पलच्या KIMS रुग्णालयात रेफर केलं. सध्या, पीडितेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: मुंबई: शाळेत सोडताना व्हॅन चालकाचा विद्यार्थीनींवर विनयभंग! पीडितेने आईला सगळंच सांगितलं अन्...
पोलिसांचा तपास
रुग्णालयात आपल्या पत्नीला भेटायला गेलेल्या पतीच्या वेदना सुद्धा स्पष्टपणे दिसत होत्या. त्यावेळी, पती म्हणाला की "माझ्या पत्नीसोबत खूपच वाईट घटना घडली आहे. खरं तर, माझ्या पत्नीला अपघात झाल्याचं मला सांगण्यात आलं होतं." पोलिसांनी आता या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT











