मुंबई: शाळेत सोडताना व्हॅन चालकाचा विद्यार्थीनींवर विनयभंग! पीडितेने आईला सगळंच सांगितलं अन्...

मुंबई तक

मुंबईतील सांताक्रूझ परिसरात एका स्कूल व्हॅन चालकावर शाळकरी विद्यार्थीनींसोबत विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

व्हॅन चालकाचा विद्यार्थीनींवर विनयभंग!
व्हॅन चालकाचा विद्यार्थीनींवर विनयभंग!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शाळेत सोडताना व्हॅन चालकाचा विद्यार्थीनींवर विनयभंग!

point

पीडितेने आईला सगळंच सांगितलं अन्...

point

मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai News: मुंबईतील सांताक्रूझ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका स्कूल व्हॅन चालकावर शाळकरी विद्यार्थीनींसोबत विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रकरणातील आरोपी व्यक्ती 48 वर्षांची असून त्याने स्कूल व्हॅनमधल्याच तीन विद्यार्थीनींसोबत विनयभंग केल्याचं सांगितलं जात आहे. शनिवारी पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपी शाळकरी मुलांना वेगवेगळ्या शाळेत सोडणाऱ्या एका खाजगी व्हॅनचा चालक आहे. 

पीडितेच्या आईने नोंदवली तक्रार... 

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पीडित मुलींनी घाबरून याबाबत कुटुंबियांना काहीच सांगितलं नाही. मात्र, काही दिवसांनंतर यातील एका पीडितेने तिच्या आईला तिच्यासोबत घडलेल्या वाईट कृत्याबद्दल सांगितलं. संबंधित पीडितेच्या आईने व्हॅनमधील इतर मुलींसोबत देखील बोलणं केलं आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणासंदर्भात तक्रार नोंदवली. 

हे ही वाचा: मुंबई : शाळेच्या कॅन्टीनमध्ये समोसा तळण्यासाठी वापरलेल्या तेलात चुकून कापूर पडला, 20 विद्यार्थ्यांना विषबाधा

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

पीडितेच्या आईने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) आणि पोक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने आरोपी व्हॅन चालकाला अटक केली.

हे ही वाचा: डोंबिवली हादरली.. बंदूक, खंजीर अन् बरंच काही.. ऐन निवडणुकीआधी 'ही' नेमकी कसली तयारी?

पोलिसांचं आवाहन   

संबंधित प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी ही केस जूहू पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, "प्रकरणातील आरोपीची सध्या चौकशी सुरू आहे आणि याबाबत सर्व बाजूंनी तपास केला जात आहे." पोलिसांनी मुलांच्या पालकांना आणि शाळेच्या प्रशासनाला आवाहन केले आहे की त्यांनी मुलांना सतर्क राहण्यास आणि कोणत्याही संशयास्पद घटनेची त्वरित पोलिसांना तक्रार करण्यास सांगितलं पाहिजे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp