भाच्याचा मृत्यूनंतर मावशी हादरली, नंतर तिनेच 3 वर्षांच्या भाचीचा गळा आवळला अन् नंतर स्वत:...

Crime News: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील एका मानसिकदृष्ट्या अस्वस्थ महिलेने तिच्या तीन वर्षांच्या भाचीची हत्या केली आणि नंतर स्वत:चं आयुष्य संपवलं केली.

ambernath shocking incident aunt went into depression after nephew death killed 3 year old niece then ended her own life

अंबरनाथमधील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)

मुंबई तक

08 Sep 2025 (अपडेटेड: 08 Sep 2025, 10:20 PM)

follow google news

अंबरनाथ: ठाणे जिल्ह्यातून एक अतिशय वेदनादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेने तिच्या तीन वर्षीय भाचीची हत्या करून नंतर स्वत:चं आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण अंबरनाथमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री घडली आहे.

हे वाचलं का?

अंबरनाथमधील नेमकी घटना काय? 

अंबरनाथच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला काही काळापासून गंभीर नैराश्यात होती. खरं तर, तिच्या बहिणीच्या 8 वर्षांच्या मुलाचा काही काळापूर्वी अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. याच घटनेचा महिलेच्या मनावर खोल परिणाम झाला होती. या घटनेमुळे ती सतत ताणतणाव होती आणि नैराश्याशी झुंजत होती.

हे ही वाचा>> Pune: पोराचे अंत्यसंस्कार थांबवले, वडील गणेश कोमकरला जेलमधून आणलं तेव्हाच दिला अग्नी.. स्मशानभूमीत नेमकं काय घडलं?

पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, तिची मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे महिलेने तिच्या बहिणीच्या 3 वर्षांच्या मुलीची म्हणजेच स्वत:च्या भाचीची गळा दाबून हत्या केली होती. यानंतर, आपण जे कृत्य केलंय ते अत्यंत भयंकर आहे याची महिलेला जाणीव झाली आणि याच अपराधीपणाच्या भावनेतून तिने बहिणीच्याच घरात गळफास घेऊन स्वत:चं जीवन संपवलं. दरम्यान, शनिवारी (6 सप्टेंबर) ही संपूर्ण घटना उघडकीस आली. ज्यानंतर संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आता या संपूर्ण घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

हे ही वाचा>> अरुण गवळी मिल कामगार ते अंडरवर्ल्ड डॉन.. दाऊदला नडणाऱ्या 'डॅडी'ची खतरनाक कहाणी

ही घटना केवळ एका कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण परिसरासाठी एक खोल धक्का आहे. निष्पाप मुलीच्या आणि तिच्या मावशीच्या मृत्यूने लोक हादरले आहेत. अशा दुःखद घटना रोखण्यासाठी मानसिक आरोग्य आणि वेळेवर उपचारांबद्दल जागरूकता असणे खूप महत्वाचे आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    follow whatsapp