सिगारेट आणलं नाही..भर रस्त्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं! थरारक Video होतोय व्हायरल

सिगारेट आणण्यास नकार दिल्याने एका माणसाने आपल्या कारनेच एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला उडवलं. यामध्ये त्या इंजिनीयर असलेल्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पाहा, नेमकं काय घडलं?

सिगारेट आणायला नाही म्हटला म्हणून थेट कारनेच उडवलं

सिगारेट आणायला नाही म्हटला म्हणून थेट कारनेच उडवलं

मुंबई तक

• 01:28 PM • 18 May 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

सिगारेट आणण्यास नकार दिल्याने केली हत्या

point

हत्येचा व्हिडीओ आला समोर

point

सिगारेट आणायला नाही म्हणाला म्हणून कारने चिरडलं

Crime news: सिगारेट आणण्यावरुन झालेल्या किरकोळ वादामुळे एका माणसाने आपल्या गाडीने एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला चिरडलं. यामध्ये त्या इंजिनीयर असलेल्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला आरोपीने त्याच्या कारने टक्कर मारल्याचं दिसत आहे. 

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं? 

'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार, ही संपूर्ण घटना कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू मध्ये घडली आहे. या घटनेत मृत पावलेला संजय हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याचा मित्र चेतन देखील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. 10 मे रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास, त्यांची रात्रीची शिफ्ट संपवून, दोघे चहा पिण्यासाठी बाहेर गेले होते. ते कोनानाकुंटे क्रॉसजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या एका स्टॉलवर चहा घेत होते. त्याच वेळी आरोपी प्रतीक त्याच्या क्रेटा कारसोबत घटनास्थळी पोहोचला. 

हे ही वाचा: Beed : रॉड, कत्ती, बेल्ट, काठीने शिवराजला मारणारे 7 जण कोण? सगळ्या आरोपींची नावं, खळबळजनक माहिती समोर

आरोपी त्याच्या पत्नीसोबत वाढदिवसाच्या पार्टीतून घरी परतत असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने दुकानाजवळ गाडी थांबवली आणि दोघांनाही त्याच्यासाठी सिगारेट आणण्यास सांगितलं, असा आरोप केला जात आहे. संजय आणि चेतन यांनी सिगारेट आणण्यास नकार दिला आणि ते म्हणाले की जर त्याला ते हवे असेल तर त्याने स्वतः दुकानातून जाऊन ते घ्यावे. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जबरदस्त वाद झाला. यानंतर, तेथील स्थानिक लोकांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली.

कारने उडवलं

यानंतर काही वेळातच संजय आणि चेतन त्यांच्या बाईकवरुन तिथून निघाले. मात्र, प्रतीक त्याची गाडी घेऊन त्यांच्या मागे गेला आणि तो यू-टर्न घेत असताना संजय आणि चेतनच्या बाईकला धडक दिल्याचा आरोप केला जात आहे. त्याने कारला इतक्या जोरात धडक दिली की कार आणि बाईक दोन्ही जवळच्या दुकानाच्या शटरवर आदळली. यामध्ये संजय गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध पडला. संजय आणि चेतन दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान, दोन दिवसांनी संजयचा मृत्यू झाला. सध्या चेतनवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा: BMC कडून थेट मिथुन चक्रवर्तींना नोटीस, 'ते' अवैध बांधकाम पाडणार? नेमकं प्रकरण काय?

पोलिसांचा तपास

CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी प्रतीकला अटक केली आहे आणि त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

    follow whatsapp