रुग्णालयात प्रेयसीसोबत वाद, नंतर स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं अन् इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून...

प्रेमसंबंधातून एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. प्रियकराने रुग्णालयात गर्लफ्रेंडसमोर स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याचं वृत्त आहे.

स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं अन्...

स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं अन्...

मुंबई तक

• 09:00 AM • 01 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रुग्णालयात प्रेयसीसोबत झाला वाद...

point

नंतर स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं अन् ...

Crime News: गुरुवारी (27 नोव्हेंबर) रात्री अहमदाबादच्या सरखेज परिसरात एक भयानक घटना घडली. फतेहवाडी येथील अल-नूर रुग्णालयाबाहेर, स्थानिकांना एक तरुण आगीत होरपळून निघाताना दिसला. तो त्याच अवस्थेत रस्त्यावर धावत होता आणि त्यानंतर काही वेळातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमागे एक धक्कादायक कारण आहे. 

हे वाचलं का?

मृत व्यक्तीचे नाव कामरान पठान असून तो काही काळापासून 28 वर्षीय सालेहा शेख नावाच्या हॉस्पिटल रिसेप्शनिस्टमुळे वैतागला होता. ते दोघे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंधात होते, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत वाद होत होते आणि त्यामुळे कामरान गंभीर मानसिक तणावात होता.

प्रेयसीसोबत भांडण झालं अन्...

रात्री 8:30 वाजताच्या सुमारास कामरान अचानक अल-नूर रुग्णालयात पोहोचला आणि तेव्हाच ही धक्कादायक घटना घडली. त्यावेळी सालेहा ड्युटीवर होती. कामरानचं तिथे त्याच्या प्रेयसीसोबत बोलणं झालं. दरम्यान, तरुणाचं तिच्याशी भांडण झालं आणि त्यात त्याने सालेहाला शिवीगाळ सुद्धा केली. त्यानंतर, त्याने एक भयानक पाऊल उचललं.

हे ही वाचा: नांदेड: आंतरजातीय प्रेमसंबंधातून प्रियकराची हत्या, प्रेयसीने मृतदेहासोबतच केलं लग्न! हळद लावून सिंदूर भरलं अन्...

स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं 

कामरानने त्याच्यासोबत पेट्रोल आणलं होते. सर्वांसमोर त्याने ते स्वतःवर ओतलं आणि हातात असलेल्या लायटरने स्वतःला पेटवून घेतलं. काही सेकंदातच त्याचे संपूर्ण शरीर आगीत होरपळून निघालं. प्रचंड वेदना होत असल्याकारणाने तो त्याच अवस्थे रुग्णालयात पळू लागला आणि त्यात रुग्णालयातील बऱ्याच वस्तूंचं नुकसान झालं. पळून जात असताना त्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली. आगीत जळत असताना तो खाली असलेल्या डेन्टल क्लिनिकमध्ये शिरला. त्याचा आरडाओरडा ऐकून रुग्णालयातील कर्मचारी आणि जवळचे लोक मदतीसाठी धावले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रुग्णालयाच्या मॅनेजरचे सुद्धा दोन्ही हात भाजले. 

हे ही वाचा: मुंबई: आता इमारतींच्या गच्चीवर होर्डिंग लावण्यास बंदी! काय आहे मुंबई महापालिकेचे नवे जाहिरात धोरण?

पोलिसांनी दिली माहिती 

दरम्यान, रस्त्यावरील लोक हे भयानक दृश्य पाहून अतिशय घाबरले. शेवटी, एका स्थानिक माणसाने अग्निशामक यंत्राचा वापर केला आणि अगदी मेहनतीने आग विझवली. पण तोपर्यंत कामरानचं शरीर गंभीररित्या भाजलं होतं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आत्मदहनाचे प्रकरण असून तरुणाने जाणूनबुजून पेट्रोल आणलं आणि तरुणीसोबत झालेल्या भांडणानंतर स्वतःला पेटवून घेतलं. दोघेही एकमेकांसोबत प्रेमसंबंधात होते आणि मानसिक तणावामुळे कामरानने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे. 
 

    follow whatsapp