मुंबई: घाटकोपरमध्ये सुनेकडून सावत्र सासुची हत्या! सीसीटीव्ही फुटेजवरून घटनेचा उलगडा... नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 10:14 AM • 30 Nov 2025

मुंबईतील घाटकोपरमध्ये एका 65 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. सुनेने आपल्याच सासूची हत्या केल्याचं वृत्त आहे.

मुंबईत सुनेकडून सावत्र सासूची हत्या!

मुंबईत सुनेकडून सावत्र सासूची हत्या!

Google CTA

बातम्या हायलाइट

point

घाटकोपरमध्ये सुनेकडून सावत्र सासूची हत्या!

point

सीसीटीव्ही फुटेजवरून घटनेचा उलगडा...

point

मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai News: बुधवारी संध्याकाळी मुंबईतील घाटकोपरच्या हिमालय सोसायटीमध्ये एका 65 वर्षीय शहनाज काझी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली होती. आता, पोलिसांनी या घटनेतील आरोपीचा शोध घेतला असून हत्येमागचं नेमकं कारण उघडकीस आणलं आहे. पीडित महिलेच्या हत्येनंतर, पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक बुरखा घातलेली महिला बिल्डिंगच्या बाहेर येताना दिसली. फुटेजमध्ये महिलेच्या पायात दिसणाऱ्या बुटांमुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. दुसऱ्या दिवशी, पोलीस घटनास्थळी पुन्हा चौकशी करण्यासाठी आले असता, तीच महिला तेच बूट घालून आली होती. खरं तर, आरोपी महिलेचं नाव मुमताज असून ती मृत महिलेची सावत्र सून असल्याची माहिती आहे. चौकशीनंतर मुमताजला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

संपत्तीच्या वाट्यासाठी रचला कट 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुमताजच्या मुलीचं लग्न होणार होतं आणि लग्नाच्या खर्चासाठी जास्त पैशांची गरज होती. शहनाज ही तिची सावत्र सासू होती. तिचा पती अनीस काझीच्या मृत्यूनंतर, शहनाजने अलीकडेच जरीमरी परिसरातील त्याची संपत्ती विकली होती आणि त्यातून तिला लाखो रुपये मिळाले होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहनाजने यापूर्वी खूप वेळा आर्थिक मदत केली होती, परंतु मुमताजला त्याच्याकडून संपत्तीचा मोठा वाटा हवा होता. 

बुरखा आणि बुटांवरून पोलिसांना संशय 

आसपासच्या परिसरातील 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर बुरखा घातलेली एक महिला घाई-घाईत जाताना दिसली. दुसऱ्या दिवशी, मुमताज स्वतः तोच बुरखा आणि ते बूट घालून पोलिसांसमोर आली होती, त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला आणि संशयित आरोपी म्हणून मुमताजला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. जिथे तिला 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: कुटुंबियांकडून बॉयफ्रेंडची हत्या, तरुणीने बॉडीसोबत लग्न केलं, पण मृतदेहासोबत लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहनाजच्या पती अनीसने दोन लग्न केली होती. शहनाज ही त्याची पहिली पत्नी तिला मुल झालं नाही. त्यानंतर, त्याने आयशा नावाच्या महिलेसोबत लग्न होतं. आयशाने सुद्धा अनीससोबत दुसरं लग्न केलं. तिच्या पहिल्या लग्नापासून चार मुलं आणि नंतर, अनीसपासून तिला तीन मुलं झाली. आयशाचा मुलगा इरफानसोबत मुमताजचं लग्न झालं होतं. 

हे ही वाचा: बारामतीसह महाराष्ट्रातील 3 नगरपालिकांसदर्भात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, मतदानासाठी नव्या तारखा जाहीर

शेजारच्यांना शहनाज मृतावस्थेत आढळली 

तपासादरम्यान, मुमताज बुधवारी हँड ग्लोव्ह्ज, बुरखा घालून आणि सोबत नायलॉनची दोरी घेऊन मुकुंद सोसायटीच्या फ्लॅट नं. A13 मध्ये शिरली. शहनाज त्यावेळी स्वयंपाक करत होती. घरात शिरल्यानंतर, तिने आधी धार्मिक पुस्तके वाचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेहलने शहनाजवर वार केला आणि त्यानंतर दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर, आरोपीने शहनाजकडून पैसे मागितले. त्यावेळी, शहनाजने तिच्या बहिणीचा फोन उचलला नाही. तेव्हा शेजारी राहणाऱ्या अन्सारी कुटुंबियांना शहनाजच्या घरी जाण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर, शेजारच्यांनी बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर, बाजूच्या घरात असलेल्या चावीने दार उघडण्यात आलं आणि तेव्हा शहनाज जमिनीवर मृतावस्थेत आढळली.