मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली अल्पवयीन मुलगी, दोघांमध्ये जागा झाला हैवान, पार्टीतच तिच्यावर नको तेच...

मुंबई तक

30 Nov 2025 (अपडेटेड: 30 Nov 2025, 06:35 PM)

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची मन हेलावणारी घटना घडली आहे. दोघांनी मिळून हे दुष्कर्म केले आहे.

sexual assault on minor girl

sexual assault on minor girl

Google CTA

बातम्या हायलाइट

point

माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार

point

मैत्रिणीच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली मुलगी नंतर तिच्यावर अत्याचार

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची मन हेलावणारी घटना घडली आहे. दोघांनी मिळून हे दुष्कर्म केले आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बगाहा येथील नौरंगिया पोलीस ठाणे परिसरातील आहे. या घटनेनं पोलीस हादरून गेले आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'धनंजय मुंडे समर्थक' नावाने फेसबुकवर फेक अकाउंट अन् अजितदादांची बदनामी, बीडमध्ये सायबर क्राईम...

मैत्रिणीच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली मुलगी नंतर तिच्यावर..

मिळालेल्या एकूण माहितीनुसार, पीडिता तिच्या मैत्रिणीच्या मावशीच्या घरी वाढदिवसासाठी गेली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी कमले आणि त्याचा साथीदार नितीश तिथे उपस्शित होते आणि नंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक शोषण केले. पीडितेनं ही घटना तिच्या कुटुंबियांना सांगितली आणि नंतर हे प्रकरण पोलिसांकडे नेण्यात आले. 

आरोपीच्या मुसक्या आवळल्या

या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी नितीशच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर मुख्य आरोपी कमलेश फरार असून त्याचा शोध घेणं सुरु आहे. या घटनेनंतर आता पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी बेतिया येथील जीएमसीएच येथे पाठवण्यात आले आहे. 

हे ही वाचा : आनंदोत्सवासाठी लग्नसोहळ्यातील मिरवणुकीत गोळीबार, नवऱ्याच्या मानेवर गोळी लागून मृत्यू, परिसरात गोंधळ उडाला

नौंरंगिया पोलीस ठाण्याचे अधिकारी शुभम कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या अर्जावरून गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ते पुढील म्हणाले, बगाह पोलीस अधिक्षकांच्या सूचनेनुसार, आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.